ICC World Cup 2023 Afg vs SA : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान आज पूर्णत: अपयशी ठरल्याचे दिसून आले. दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर अफगाणिस्तानची फलंदाजी घसरल्याचे दिसून आले. अफगाणिस्तानची सुरुवातच खराब झाली. पॉवर प्लेच्या आतमध्येच त्यांचे ३ फलंदाज तंबूत परतले होते. रहमान गुरबाज, इब्राहीम झार्डन, हशमतुल्ला शाहीदी हे तिघेही १० ओव्हरच्या आतमध्ये तंबूत परतले होते.
Hashmatullah Shahidi won the toss and elected to bat first in Ahmedabad 🏏#CWC23 | #SAvAFG 📝: https://t.co/295T8y3zFn pic.twitter.com/TDvpk44H9I
— ICC (@ICC) November 10, 2023
बांगलादेशची फलंदाजी
अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला आज पूर्णत: अपयशी ठरत २ धावांवर तंबूचा रस्ता गाठला. त्यानंतर आलेल्या अझमतुल्ला ओमराझई सध्या ५१ धावांवर खेळत आहे. त्यानंतर आलेले विकेटकिपर इक्रम एकिकी आणि मोहम्मद नाबी हे तंबूत परतले आहेत. राशिद खान सध्या १३ धावांवर खेळत आहे.
अफगाणिस्तानने निर्धारित ५० षटकांत २४४ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेने यावेळी चांगली गोलंदाजी करीत अफगाणिस्तानच्या खेळाडूंना रोखून धरण्यात यश आले.
दक्षिण अफ्रिका २४५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली. यानंतर क्विंटन डी कॉक आणि नंतर तेंबा बहुमा यांनी चांगली खेळी करीत दक्षिण अफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली आहे.
दक्षिण अफ्रिका २४५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली. यानंतर क्विंटन डी कॉक आणि नंतर तेंबा बहुमा यांनी चांगली खेळी करीत दक्षिण अफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली आहे.