ICC WORLD CUP 2023
SL VS AFG
ICC WORLD CUP 2023 SL VS AFG

सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची अचूक गोलंदाजी, त्यांची फिल्डींग, क्षेत्ररक्षण पाहत्या कोणत्याही जाणकार क्रिकेटप्रेमीला अफगाणी खेळाडूंचे या मॅचवर असलेले वर्चस्व दिसून येत होते. त्यानंतर त्यांनी फलंदाजीत दाखवलेली कमालीची संयमता त्यांना विजयाकडे घेऊन गेली. अफगाणिस्तानने अखेर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

    पुणे : आज पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात लढत पाहायला मिळाली. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणी खेळाडूंची गोलंदाजी सुरुवातीपासूनच आक्रमक राहिली. त्यांनी श्रीलंकन खेळाडूंना जखडून ठेवण्यात चांगलेच यश मिळवले.

    श्रीलंकेच्या एकाही खेळाडूंची हाफ सेन्च्युरी नाही

    श्रीलंकेचा एकाही खेळाडूने हाफ सेन्च्युरी मारू शकला नाही. कारण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी त्यांना ती संधीच मिळू दिली नाही. त्यामुळे श्रीलंकेचा सर्व डाव 241 धावांवर आटोपला.

    अफगाणिस्तानसमोर 242 धावांचे लक्ष्य

    अफगाणिस्तान 242 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली. परंतु त्यांचा सलामीचा फलंदाज रहमनुल्ला गुरबाज 0 शून्यावरच आऊट झाला. परंतु, त्यानंतर रहमद शाह आणि इब्राहीम झार्डनने संघाची कमान सांभाळत धावसंख्या हलती ठेवली. दोघांनी 70 धावांची चांगली भागीदारी करीत डावाला आकार दिला.

    रहमत शाहने संयमी खेळी करीत 74 चेंडूत 62 धावांची मोठी खेळी केली. त्यानंतर इब्राहीम झार्डन त्याला चांगली साथ देत 57 चेंडूत 39 धावा केल्या. आज कर्णधार हशमतुल्ला शाहीदीने खणखणीत 58 धावा चोपल्या त्याला अझमतुल्ला ओमरझाईन दणदणीत साथ देत 63 चेंडूत 73 धावा काढत विजयावर शिक्कामोर्तब केला.

    श्रीलंका संघ

    पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (c&wk), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश थेक्षाना, कसुन रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका

    अफगाणिस्तान संघ

    रहमानउल्ला गुरबाज (wk), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (c), अझमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी