ICC World Cup 2023 Australia vs Bangladesh

    ICC World Cup 2023 Aus vs Bang Live : बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशकडून तोव्हीद ऱ्हीदोय याने 74 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज विशेष कामगिरी करू शकला नाही. तांझीद हसन, लिटन दास, शांतो, महमुदुल्ला, मुश्तफीर रहीम, मेंहदी हसन, नसुम अहमद यांच्यातील एकही फलंदाज 45 धावांच्या पुढे धावा करू शकला नाही. दरम्यान, बांगलादेशने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 305 धावा केल्या.
    307 धावांचे लक्ष्य लिलया पार
    ऑस्ट्रेलिया 307 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली. त्यांचा सलामीवीर ट्रावीस हेड हा लवकर बाद झाल्यानंतर अॉस्ट्रेलियाने डाव सावरत विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. डेव्हीड वॉर्नरने 61 चेंडूत 53 धावा करीत संघाची धावसंख्या चांगली वाढवली. त्यानंतर मायकेल मार्श आणि स्टिव्हन स्मिथने जबरदस्त भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दारात नेऊन ठेवले. मायकेल मार्श सध्या नाबाद 166 धावांवर खेळत आहे. तर स्टिव्हन स्मिथ 53 धावांवर खेळत आहे.