England vs Australia Live
England vs Australia Live

    अहमदाबाद/नरेंद्र मोदी स्टेडियम : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लड समोर 287 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवातच थोडी निराशाजनक राहिली. सलामीला आलेल्या हेड आणि वॉर्नर लवकरच पॅव्हेलिनमध्ये परतले, त्यांना व्होक्सने तंबूचा रस्ता दाखवला.

    स्मिथ आणि लांबुनशुंगेची मोठी भागीदारी

    त्यानंतर आलेल्या स्टिव्ह स्मिथ आणि लांबुनशुंगे यांनी टीम ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. त्यानंतर ग्रीन आणि स्टोइनेसने ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येत भर टाकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली. अॉस्ट्रेलिया निर्धारित 50 षटकांत 286 धावा केल्या.