ICC World Cup 2023 England vs Pakistan live

    ICC World Cup 2023 Eng vs Pak Live : इंग्लडने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर 338 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इंग्लडने आज चांगली सुरुवात करीत पाकच्या खेळाडूंसमोर मोठे लक्ष्य ठेवले आहे. सलामीला आलेल्या मॅलन आणि ब्रिस्टो यांनी डावाची चांगली सुरुवात करीत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर इंग्लडच्या वरच्या फळीतील सर्वच फलंदाजांनी दमदार खेळी करीत पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. आज इंग्लडच्या फलंदाजांनी 300 धावांचा टप्पा पार करीत पाकिस्तानसमोर 337 धावांचा डोंगर उभा केला.
    पाकिस्तानची सुरुवातच डळमळीत
    पाकिस्तान 338 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली आहे. पाकिस्तानची सुरुवातच डळमळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाकची सलामी जोडी 18 धावांच्या आत तंबूत परतली आहे. 5 ओव्हरमध्ये पाकच्या 2 विकेट गमावून 18 धावा केल्या आहेत.