ICC World Cup 2023 New Zealand vs Sri Lanka
ICC World Cup 2023 New Zealand vs Sri Lanka

    ICC World Cup 2023 NZ vs SL : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांची आज दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे खेळाडूंची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. श्रींलकेच्या कुसल परेरा व्यतिरिक्त एकही फलंदाज पिच टिकू शकला नाही. श्रीलंकेचा सलामी फलंदाज निसंका अवघ्या 2 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंची जी घसरण पाहायला मिळाली, एका मागोमाग फलंदाज तंबूतून येत होते आणि जात होते. श्रीलंकेकडून कुसल परेरा आणि महेश तिक्षणाव्यतिरिक्त कोणीसी वीस धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. आता सध्या महेश थिक्षणा आणि दिलशान मधुशंका हे दोघे खेळत आहेत.

    न्यूझीलंडचा 5 विकेट राखून दणदणीत विजय

    श्रीलंकेने दिलेले 172 धावांचे लक्ष्य गाठताना न्यूझीलंडने 24 ओव्हरमध्ये ते पूर्ण केले. न्यूझीलंडने 5 विकेट गमावून 23.2 ओव्हरमध्ये 172 धावांचे लक्ष्य त्यांनी पार केले. सलामीला आलेल्या डेव्हीड कॉन्वे आणि राचिन रवींद्र यांनी चांगली भागीदारी करीत न्यूझीलंडला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार काने विल्यम्स याने 14 धावा करून तंबूचा रस्ता धरला. त्यानंतर डेरी मायकेलने महत्त्वाची खेळी करीत 43 धावा केल्या. आज न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे फलंदाज पुरते नेस्तनाबूत झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकेने दिलेले 172 धावांचे माफक लक्ष्य त्यांनी लिलया पार करीत विजयावर शिक्कामोर्तब केला.

     

    न्यूझीलंड संघ : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (क), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (विकेटकीपर), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

    श्रीलंकेचा संघ : पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कंडल आणि विकेट), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, दुष्मंथा चमीरा, दिलशान मधुशानका