पाकिस्तानचा न्यूझीलंडवर 21 धावांनी विजय; डकवर्थ लुईस स्टर्न नियमानुसार केले विजयी घोषित

    ICC World Cup NZ vs Pak Match Live Updates : न्यूझीलंडने दिलेले 402 धावांचे लक्ष्य गाठताना पाकिस्तानने दमदार फलंदाजी करीत 25 ओव्हरमध्ये 200 धावा करीत न्यूझीलंडला 21 धावांनी मात दिली आहे. बंगळुरूच्या चेन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने पाकला डकवर्थ लुईस नियमानुसार विजयी घोषित केले आहे.

    या विजयानंतर पाकिस्तानचे स्पर्धेत टिकून

    दुखापतग्रस्त खेळाडूंच्या समस्येने झगडत असलेल्या न्यूझीलंडचा आज विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानचा सामना होत आहे. ज्यामध्ये दोन्ही संघ विजयासाठी आतुर असतील. उपांत्य फेरी गाठण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तो चुकीचा ठरला. न्यूझीलंडने 6 बाद 401 धावा केल्या. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर त्यांना 402 धावांचे लक्ष्य गाठावे लागेल.

    न्यूझीलंडची धमाकेदार फलंदाजी
    प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने धमाकेदार खेळी करीत निर्धारित 50 षटकांत 401 धावा करीत पाकिस्तानसमोर मोठे आव्हान ठेवले आहे. राचिन रवींद्र आणि विल्यमसन यांनी मोठी भागीदारी करीत न्यूझीलंडच्या धावसंख्येत मोलाची भर टाकली. राचिन रवींद्रने 94 चेंडूत 108 धावा ठोकत पाकिस्तानी गोलंदाजांना पाणी पाजले. तर कर्णधार विल्यमसनने 79 चेंडूत 95 धावा करीत संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला.