New Zealand vs South Africa match
New Zealand vs South Africa match

  पुणे : पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना सुरू आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या साऊथ अफ्रिकेची पहिली विकेट लवकरच गेली. परंतु आज क्विंटन डी कॉक आणि दुसेन यांनी दक्षिण अफ्रिकेचा डाव पुढे नेत, शतकी खेळी केली. दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंडसमोर 357 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  दक्षिण अफ्रिकेची फलंदाज

  सलामीला आलेल्या क्विंटन डी कॉक आणि तेंबा बहुमा यांनी डावाची सुरुवात केली. परंतु, बोल्टने तेंबा बहुमाला तंबूचा रस्ता दाखवला. क्विंटन डी कॉकने संयमी खेळी करीत 85 चेंडूत 72 धावांची चांगली खेळी करीत दक्षिण अफ्रिकेच्या संघाला चांगला आकार दिला. त्यानंतर रसिया वॅन देर दुसेन याने क्विंटन डी कॉकला चांगली साथ देत 52 धावा केल्या. सध्या दक्षिण अफ्रिका 192 धावांवर खेळत आहे.

  न्यूझीलंडची फलंदाजी

  न्यूझीलंड 357 धावांचे लक्ष्य मैदानात उतरली खरी पण आज दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवून टाकली. न्यूझीलंडचे फलंदाज मैदानावर टिकूच शकले नाहीत. एकही फलंदाज 40 धावा करू शकला नाही. न्यूझीलंडच्या फलंदाजांची पहिली फळी लवकरच तंबूत परतली. डेव्हीड कॉन्वे, डेरी मायकेल, कर्णधार टोम लॅथम, मायकेल सॅन्टर अक्षरशः अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. एकामागोमाग फलंदाज तंबूत परतत होते. विश्वचषकातील आघाडीची टीम आज पुरती नामोहरम झाल्याची पाहायला मिळाली.

  दक्षिण अफ्रिकेची फलंदाजी
  दक्षि अफ्रिकेने आज सुरुवातीपासूनच जोरदार खेळी केली. कर्णधार तेंबा बहुमा लवकर आऊट झाला तरीही क्विंटन डी कॉक आणि रसिए वॅन देर दुसेन यांनी दक्षिण अफ्रिकेचा धावसंख्या चांगल्याच प्रकारे वाढवली. रसिए वॅन देर दुसेन सध्या 131 धावांवर खेळत आहे. आज क्विंटन डी कॉकनेसुद्धा 116 चेंडूत 114 धावांची खेळी करीत दक्षिण अफ्रिकेच्या डावाला चांगलाच आकार दिला. आज दक्षिण अफ्रिका 300च्या पार जाणार आहे.

  साऊथ अफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (captain), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

  न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट