विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड यांची लढत; मोहम्मद रिझवान आणि सौद शकीलने सावरला डाव

Pakistan vs Netherlands : विश्वचषकातील दुसरा सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना सुरू आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात आतापर्यंत 6 वनडे सामने झाले आहेत. पाकिस्तानने ते सर्व जिंकले आहेत. आज पाकिस्तानची सलामी जोडी लवकरच आऊट झाली, परंतु मोहम्मद रिझवान, सौद शकीलने पाकिस्तानचा डाव सावरला.

  Pakistan vs Netherlands, 2nd Match Live Cricket Score : अवघ्या नऊ शतकांत तीन बाद 38 अशी अवस्था झालेल्या पाकिस्तानला मोहम्मद रिजवान आणि शकील यांच्या भागीदारीन सावरले आहे. चौथ्या विकेटसाठी त्यांनी केलेल्या भागीदारीने पाकिस्तानचा डाव शंभरी पार गेला आहे.

   

  पाकिस्तानच्या डावाला आकार

  पाकिस्तानच्या 20 षटकांत तीन बाद 101 धावा झाला आहेत. शकील 28 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानची 9 षटकांमध्ये तीन बाद 38 अशी अवस्था झाली होती. पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर अपयशी ठरल्यानंतर कर्णधार बाबर आझमही स्वस्तात परतल्याने पाकिस्तान अडचणीत आला होता. मात्र, मोहम्मद रिझवान आणि शकीलने केलेल्या भागीदारीने पाकिस्तानच्या डावाला आकार आला आहे.

  पाकिस्तानला तिसरा हादरा, नेदरलँडचा भेदक मारा
  Pakistan vs Netherlands, 2nd Match – Live Cricket Score : दहा षटकांमध्ये पाकिस्तानला नेदरलँडच्या गोलंदाजांनी चांगलेच हादरे दिले आहेत. दोन्ही सलामीवीरांसह तीन फलंदाज तंबूत धाडस सामन्यावरती चांगलीच पकड मिळवली आहे. अवघ्या 9.4 षटकात पाकिस्तानची अवस्था तीन बाद 42 अशी झाली आहे. सलामीवीर फकर जमान 12 धावांवर बाद झाला. इमाम हक 15 धावांवर बाद झाला, तर कर्णधार बाबर आझम अवघ्या पाच जणांवर तंबूत परतला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था नाजूक झाली आहे. नेदरलँडच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचे फलंदाज अडखळताना दिसत आहेत. सध्या मैदानात मोहम्मद रिझवान आणि शकील आहेत.

  दुबळ्या नेदरलँडविरोधातही बाबर आझम सपशेल अपयशी, पाकिस्तानला दुसरा धक्का
  Pakistan vs Netherlands, 2nd Match – Live Cricket Score : नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी झालेल्या पाकिस्तानची पहिल्या दहा ओव्हरमध्येच नेदरलँडने दोन हादरके दिले आहेत. नऊ षटकांमध्ये 38 धावा देत पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना माघारी धाडण्याचे काम नेदरलँडच्या गोलंदाजांनी केलं आहे. सलामीवीर फकर जमान अवघ्या 12 धावांवर बाद झाला, तर कर्णधार बाबरही 5 धावांवर परतला. बाबर आझमने मोठ्या धावसंख्येचा निर्धार बोलून दाखवला होता. मात्र, अवघ्या दहा षटकांमध्ये त्यांचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत.

  नेदरलँडने टॉस जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजी दिली
  Pakistan vs Netherlands, 2nd Match – Live Cricket Score :आयसीसी वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्याला प्रारंभ झाला आहे. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानची लढत तुलनेत कमकुवत असलेल्या नेदरलँडविरुद्ध होत आहे. नेदरलँडने टॉस जिंकून प्रथम पाकिस्तानला फलंदाजी दिली आहे. पाकिस्तानच्या फलंदाजी सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने या सामन्यात 300 वर टार्गेट ठेवलं असल्याचं कॅप्टन बाबर आझम म्हणाला. पाकिस्तानकडून सलामीवीर फकर जमान आणि इमाम उल हक मैदानात आहेत.