World Cup 2023 SA vs Aus Live | SA vs Aus सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट राखून विजय मिळवला; 19 नोव्हेंबरला रंगणार इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा रणसंग्राम | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेट7 महीने पहले

SA vs Aus सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट राखून विजय मिळवला; 19 नोव्हेंबरला रंगणार इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा रणसंग्राम

ऑटो अपडेट
द्वारा- Yuvraj Bhagat
22:43 PMNov 16, 2023

शेवटपर्यंत चाललेल्या रोमांचक सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांची लढत अपुरी ठरली, ऑस्ट्रेलियाने 3 विकेट राखून विजय मिळवला. दक्षिण अफ्रिकेने दिलेले 213 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 48 ओव्हरपर्यंत वाट पाहावी लागली.
20:31 PMNov 16, 2023

दक्षिण अफ्रिकेच्या शम्सीने धमाकेदार बॉलिंग करीत आज ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले आहे. ग्लेन मेक्सवेल याला त्रिफळाचित करून ऑस्ट्रेलियाला २१३ धावांचे लक्ष्य गाठणे अवघड ठरणार आहे.
20:02 PMNov 16, 2023

ऑस्ट्रेलियाने 17 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावूनम 116 धावा केल्या आहेत.
18:52 PMNov 16, 2023

ऑस्ट्रेलियाचा संघ 213 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रेविस हेड आणि डेव्हीड वॉर्नर सध्या खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाने जर पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता स्कोअर हलता ठेवला तर ऑस्ट्रेलिया नक्कीच फायनलमध्ये पोहचेल.
18:20 PMNov 16, 2023

ऑस्र्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेचा २१२ धावांवर ऑलआऊट केला आहे. क्लासेन आणि डेव्हीड मिलर यांची भागीदारी महत्त्वाची ठरली आहे. डेव्हीड मिलरने १०१ धावांची महत्त्वाची भर टाकत दक्षिण अफ्रिकेची धावसंख्या चांगली वाढवली. अखेर दक्षिण अफ्रिकेचे डेव्हीड मिलर, क्लासेन वगळता एकही फलंदाज प्रभावी ठरला नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया हे आव्हान कसे निभावते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
18:00 PMNov 16, 2023

दक्षिण अफ्रिकेच्या 46 ओव्हरमध्ये 191 धावांवर 8 विकेट गेल्या आहेत. क्लासेननंतर डेव्हीड मिलरने दक्षिण अफ्रिकेचा डाव सांभाळला. सध्या डेव्हिड मिलर 94 धावांवर खेळत आहे.

कोलकाता : आयसीसी वर्ल्ड कप २०२३ मध्ये आज कोलकाताच्या ईडन गार्डनवर दक्षिण अफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांना जेरीस आणण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगले यश आले आहे. ऑस्ट्रेलियाने ११ ओव्हरमध्ये त्यांचे ४ महत्त्वाचे फलंदाज तंबूत पाठवले आहेत. त्यानंतर सुद्धा साऊथ अफ्रिकेची फलंदाजी घसरत राहिली परंतु क्लासेन आणि डेव्हीड मिलरने चांगली भागीदारी करीत डावाला आकार दिला. परंतु, क्लासेनला बाद केल्यानंतर एकट्या मिलरने महत्त्वाची खेळी करीत दक्षिण अफ्रिकेला एका सन्मानजनक स्कोअरपर्यंत नेऊन ठेवले.

दक्षिण अफ्रिकेची सुरुवात खूपच निराशाजनक

आज दक्षिण अफ्रिकेची सुरुवात खूपच निराशाजनक राहिली. दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय त्यांच्या पथ्यावर न पडल्याचे दिसून आले आहे. दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या फळीतील ४ फलंदाज पॉवर प्लेच्या आतमध्ये तंबूत परतले आहेत. सलामीला आलेली जोडी आज पूर्णत: निष्प्रभ ठरली आहे. आज त्यांच्या ११ ओव्हरमध्ये ४ विकेट गेल्याचे पाहायला मिळाले.

क्लासेन आणि डेव्हीड मिलरची भागीदारी ठरणार निर्णायक

दक्षिण अफ्रिकेची फलंदाजी घसरली असताना आता क्लासेन आणि डेव्हीड मिलर यांची भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे. दोघांनी मिळून आतापर्यंत ४३ धावांची भागीदारी केली आहे.

क्लासेन आऊट

अखेर क्लासेन आणि डेव्हीड मिलर यांची जोडी फोडण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले आहे. ऑस्ट्रेलियालाच्या गोलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेची गोलंदाजांचा धुव्वा उडाला आहे. आतापर्यंत दक्षिण अफ्रिकेच्या ६ विकेट गेल्याने त्यांचे कंबरडे मो़डले आहे.

दोन्ही संघांनी नऊपैकी सात सामने जिंकले

विश्वचषकाच्या साखळीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांनी नऊपैकी सात सामने जिंकून, प्रत्येकी 14 गुणांची कमाई केली होती. पण नेट रनरेटच्या निकषावर दक्षिण आफ्रिकेनं गुणतालिकेत दुसरा आणि ऑस्ट्रेलियाने तिसरा क्रमांक पटकावला होता. पण, उभय संघांमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी धुव्वा उडवला होता. आज ऑस्ट्रेलिया हिशोब चुकता करणार की आफ्रिका फायनलमध्ये पोहचणार ? हे काही तासांमध्येच समजणार आहे.

OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.