World Cup Semifinal Ind vs NZ Match Live | शमीचा शमा! भारतीय संघ फायनलमध्ये, वानखेडे च्या मैदानावर टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 70 धावांनी मोठा विजय | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेट14 दिन पहले

शमीचा शमा! भारतीय संघ फायनलमध्ये, वानखेडे च्या मैदानावर टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 70 धावांनी मोठा विजय

ऑटो अपडेट
द्वारा- Yuvraj Bhagat
23:24 PMNov 15, 2023

अखेर मोहम्मद शमीने करून दाखवले, वर्ल्ड कपच्या सेमी फायनल मध्ये भारताला सात विकेट मिळवून देत मॅन ऑफ द मॅच चा पटकावला. शेवटपर्यंत चाललेल्या रोमांचक सामन्यात भारताने 70 धावांनी मोठा विजय प्राप्त करत फायनलमध्ये प्रवेश केला.
19:02 PMNov 15, 2023

मोहम्मद शमीवर कर्णधाराचा विश्वास अन् त्याने करून दाखवले. त्याने भारताला पहिल्या दोन विकेट मिळवून दिल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीसमोर किवींना टिकणे मोठे अवघड आहे.
18:44 PMNov 15, 2023

न्यूझीलंडची टीम 398 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली आहे. सलामी जोडी रचिन रवींद्र आणि डेव्हीड कॉन्वे हे सलामीला उतरले आहेत. न्य़ूझीलंडने 4 ओव्हरमध्ये 29 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा सलामीवीर रचिन रवींद्र हा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो जर खेळला तर भारतासमोर अवघड ठरू शकते.
17:54 PMNov 15, 2023

श्रेयस अय्यरने धमाकेदार शतक पूर्ण करीत 70 चेंडूत 105 धावांची मोठी खेळी केली. श्रेयस अय्यरने 70 चेंडूत 105 धावांची मोठी खेळी करीत एक ऐतिहासिक शतक पूर्ण केले आहे. त्यानंतर केएल राहुलने चौकार, षटकारांची बरसात करीत 20 चेंडूत 39 धावांची दमदार खेळी केली. शुभमन गिलसुद्धा शेवटाला येऊन त्याने 66 चेंडूत 80 धावा केल्या आहेत. आज भारतीय संघाची फलंदाजी जोरात राहिली.
17:37 PMNov 15, 2023

विराटची विकेट गेल्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर खेळत आहेत. श्रेयस अय्यरने धमाकेदार शतक पूर्ण केले आहे. त्याने 67 चेंडूत दमदार शतक पूर्ण करीत क्रिकेट चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे.
17:21 PMNov 15, 2023

विराट कोहलीने धमाकेदार खेळी करीत 117 घानांती मोठी खेळी केली. आज विराटने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने 113 चेंडूत 117 धावांची मोठी खेळी करीत टीम इंडियाचा स्कोअर वाढवण्यात मोलाची भर टाकली.
16:14 PMNov 15, 2023

शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्याने पॅव्हेलिनमध्ये परतला. शुभमने 79 धावा करून पायाच्या दुखापतीमुळे तंबूत परतला आहे. विराट कोहलीने धमाकेदार खेळी करीत हाफ सेन्च्युरी केली आहे. सध्या विराट 70 चेंडूत 64 धावांवर खेळत आहे. त्याने आपल्या खेळीत चौकार, षटकारांची बरसात केली आहे.
15:35 PMNov 15, 2023

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेले रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आखलेली रणनीती आज पाहायला मिळाली. सुरुवातीलाच दोघांनी चांगली फटकेबाजी करीत भारताची धावसंख्या आघाडीवर ठेवली. परंतु, कर्णधार रोहित शर्मा एक खराब शॉट खेळताना 47 धावांवर झेलबाद झाला. शुभमन गिलने धमाकेदार 50 धावा करीत टीम इंडियाचा रनरेट वेगाने वाढवला. सध्या विराट कोहली आणि शुभमन गिल खेळत आहेत.
14:05 PMNov 15, 2023

रोहित शर्माने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्या संघाने या पिचवर प्रथम फलंदाजी केली त्याचा सर्वाधिक वेळा विजय झाला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हे शुभ संकेत असल्याचे दिसून येत आहे. मोठा स्कोअर उभा करून प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देणे सोपे असणार आहे.

शमीने घेतल्या पहिल्या 2 विकेट,

मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप 2023 चा सर्वात हायव्होल्टेज आणि महत्त्वाचा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरु आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा टॉस जिंकल्याने भारताने बऱ्यापैकी सामन्यावर वर्चस्व ठेवले आहे. कारण ही पिच बॅटींगसाठी नेहमीच सुवर्णसंधी ठरली आहे. या पिचवर जो पहिली बॅटींग करतो त्याचा विजय सर्वाधिक वेळा झाल्याचे दिसून आले आहे. आता वर्ल्ड कप 2019 वेळेला भारताला मिळालेली संधी न्यूझीलंडने हिरावून घेतली होती आता मागचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी भारताला मिळाली आहे. भारत या संधीचे सोने करतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

विराटने धमाकेदार शतक पूर्ण करीत सचीनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

विराटनंतर श्रेयस अय्यरची धमाकेदार शतकी खेळी…

उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी दोन्ही संघातील संभाव्य ११

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड- डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

View Results

Loading ... Loading ...
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.