साऊदम्पटनमधील हवामानाचे ताजे फोटो समोर, पाचव्या दिवशी खेळ होणार की नाही?; दिनेश कार्तिकने ट्विटरवरून दिली माहिती

भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) जो सध्या इंग्लंडमध्ये कॉमेन्ट्रीसाठी गेला आहे. त्याने साऊदम्पटन मैदानातील हवामानाचे ताजे अपडेट देत फोटोही शेअर केला आहे. दिनेशने हवामानाचे ताजे अपडेट्स देत शेअर केलेल्या फोटोमध्ये आज दिवसभर वातावरण साफ राहणार असल्याचे दिसून येत आहे. इंग्लंडमध्ये अधिक काळ असणारं ढगाळ वातावरणच आजही असणार असून त्यामध्ये खेळ होऊ शकतो अशी माहिती कार्तिकने आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.

    इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (ICC WTC Final) पहिल्या दिवशीपासून पाऊस, कमी सूर्यप्रकाश अशा हवामानासंबधी बाबींचा अडथळा समोर येत आहे. पहिल्य आणि चौथ्या दिवशीचा तर संपूर्ण खेळच पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे सर्वच क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला. त्यात आता पाचव्या दिवशी खेळ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

    दरम्यान भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) जो सध्या इंग्लंडमध्ये कॉमेन्ट्रीसाठी गेला आहे. त्याने साऊदम्पटन मैदानातील हवामानाचे ताजे अपडेट देत फोटोही शेअर केला आहे. दिनेशने हवामानाचे ताजे अपडेट्स देत शेअर केलेल्या फोटोमध्ये आज दिवसभर वातावरण साफ राहणार असल्याचे दिसून येत आहे. इंग्लंडमध्ये अधिक काळ असणारं ढगाळ वातावरणच आजही असणार असून त्यामध्ये खेळ होऊ शकतो अशी माहिती कार्तिकने आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.

    दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु होण्यापूर्वी हवामानाची स्थिती सर्वात आधी भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) जो सद्या कॉमेन्ट्री करण्यासाठी इंग्लंडला आहे त्यानेच दिली होती. दिनेशने मैदानाचे ताजे फोटो शेअर करत तेथे सूर्य उगवला असून आजचा खेळ होणार असल्याचे सांगितले होते