rain in india vs new zealand match

डकवर्थ लुईसच्या नियमानुसार नऊ षटकात ७५ धावांची गरज आहे आणि भारताने (India Vs Newzealand T-20 Match) देखील ७५ धावाच केल्या आहेत. जर पाऊस थांबला नाही तर भारत आणि न्यूझीलंडमधला टी-२० सामना बरोबरीत सुटेल.

    भारत विरुद्ध न्यूझीलंड (India Vs New Zealand Match) या संघांमध्ये टी -२० (T-20) मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना खेळवण्यात येत आहे.(Cricket News) दुपारी १२ वाजता या सामन्याला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकत फलंदाजी घेत भारताला विजयासाठी १६१ धावांचे आव्हान दिले. मात्र शेवटचे काही षटक सुरु असतानाच स्टेडियममध्ये पावसाचे आगमन झाल्यामुळे सध्या पावसामुळे सामना थांबला आहे.

    नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघने प्रथम फलंदाजी घेतली. परंतु न्यूझीलंडच्या त्या दोन खेळाडूंव्यतिरिक्त कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावर दबाव आणत शेवटच्या पाच षटकात ३० धावांत तब्बल ८ गडी गमावले. या दोघांच्या जोरावरच न्यूझीलंडला दीडशे धावांचा आकडा पार करता आला. हा सामना न्यूझीलंडसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण, यापूर्वी झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे भारत या मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांनी न्यूझीलंड संगःला नाकीनऊ आणले. दोघांनीही प्रत्येकी ४ गडी बाद करत आपल्या नावावर एक विक्रम केला. तर डावखुरा गोलंदाज अर्शदीपने ४ षटकात ३७ धावा देत ४ बळी घेतले. त्याला, हर्षल पटेल याने १ गडी बाद करत मोलाची साथ दिली.

    स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडने दिलेल्या १६१ धावांचा पाठलाग करण्यासाठी ईशान किशन आणि ऋषभ पंत फलंदाजीला आले मात्र सलामीवीर ईशान किशन १० धावा करून बाद झाला. त्यापाठोपाठ मोठे फटके मारण्याच्या नादात डावखुरा फलंदाज ऋषभ पंत ११ धावा करून बाद झाला. त्याला टीम साऊदीने बाद केले. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने श्रेयस अय्यरला भोपळाही न फोडू देता तंबूत पाठवले. भारतीय संघाचे ईशान किशन, पंत आणि अय्यर हे तीन फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या नी सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सूर्यकुमार यादव मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला त्याला गोलंदाज ईश सोधीने १३ धावांवर बाद केले. भारत-न्यूझीलंड सामन्यात पुन्हा पावसाने खोडा घातला असून पाऊस सामान थांबला आहे. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार नऊ षटकात ७५ धावांची गरज आहे आणि भारताने देखील ७५ धावाच केल्या आहेत. जर पाऊस थांबला नाही तर सामना बरोबरीत सुटेल.