India-Pakistan मॅच पाहण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना इमरानने परत बोलावले, टीएलपीच्या आगीत होरपळतोय पाकिस्तान

या सगळ्या तणावाच्या काळात पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद (Pakistan's Home Minister Sheikh Rashid) देशातील कायदा सुव्यवस्था (Law and Order) सांभाळायचे सोडून, भारत-पाकिस्तान मॅच (India-Pakistan Match) पाहण्यासाठी दुबईला (Dubai) पोहोचले होते.

  इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan) सध्या प्रतिबंधित कट्टरपंथी संघटना तहरिक ए लब्बेक (टीएलपी)च्या समर्थकांची जोरदार निदर्शने सुरु आहेत. लाहोरमध्ये (Lahore) तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

  या सगळ्या तणावाच्या काळात पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद (Pakistan’s Home Minister Sheikh Rashid) देशातील कायदा सुव्यवस्था (Law and Order) सांभाळायचे सोडून, भारत-पाकिस्तान मॅच (India-Pakistan Match) पाहण्यासाठी दुबईला (Dubai) पोहोचले होते. देशातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळण्यासाठी इम्रान खान (Imran Khan) यांनी गृहमंत्र्यांना शनिवारी परत मायदेशात बोलावले आहे.

  देशात विरोधक आणि बंदी घातलेल्या संघटनांची वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. इस्लामाबाद, लाहोर आणि रावळपिंडीतील अनेक भाग बंद करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी भारत-पाक मॅच लाईव्ह बघण्यासाठी गृहमंत्री शेख रशीद यांनी इम्रान खान यांच्याकडून दोन दिवसांची सुट्टी मंजूर करुन घेतली होती आणि ते दोन दिवसांपूर्वी दुबईत पोहचले होते.
  मात्र पाकिस्तानातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना पुन्हा बोलावून घेण्यात आले आहे.

  शनिवारी सकाळी ते शारजाहून इस्लामाबादला पोहचले. ठिकठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनांना काही ठिकाणी हिंसक वळण लागले असून, काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याच्या घटना घडल्या आहेत. यात अनेक जण गंभीर झाले आहेत. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान रोखण्यासाठी जेव्हा आंदोलनकर्त्यांना अडवण्यात आले, तेव्हा जमाव संतप्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  संतप्त जमावाने लाठीमार आणि दगडफेक केल्याच्याही घटना घडल्या आहेत. आंदोलनकर्त्यांनी एका पोलीस स्टेशनवर हल्ला केल्यानंतर, पोलिसांना अश्रूधुराचा वापरही करावा लागला. पाकिस्तानात गेल्या काही महिन्यांपासून असा हिंसाचार सुरु आहे. यातूनच टीएलपी (TLP)वर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारला करावा लागला आहे. टीएलपीचे प्रमुख साद हुसैन रिझवी यांची सुटका करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. रिझवी यांना १२ एप्रिल रोजी हिंसा भडकवण्याच्या आरोपाखाली पंजाब पोलिसांनी अटक केली होती, तेव्हापासून ते कोठडीत आहेत.