पंजाब आणि बंगळुरूसमोर ‘करो या मरो’ की स्थिती! पराभव झाला तर शर्यतीतून बाहेर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे 7व्या आणि 8व्या स्थानावर आहेत आणि दोघांचेही सध्या प्रत्येकी आठ गुण आहेत.

    पंजाब विरुद्ध बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीग 2024चा (Indian Premier League 2024) आज 58वा सामना रंगणार आहे. आजच्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. कालच्या सनरायझर्स हैदाबादच्या संघाने लखनौ सुपर जायंट्सवर 10 विकेट्स विजय मिळवून मुंबई इंडियन्सच्या संघाला प्लेऑफमधून बाहेर काढले आहे. उरलेल्या 9 संघांमध्ये टॉप – 4 साठी चढाओढ सुरु आहे. आज बंगळुरू आणि पंजाब यांच्यामधील आच हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला येथे पाहायला मिळणार आहे.

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे 7व्या आणि 8व्या स्थानावर आहेत आणि दोघांचेही सध्या प्रत्येकी आठ गुण आहेत. दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी ही लढत खूप महत्त्वाची ठरणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांनी आतापर्यंत 11 सामने झाले आहेत त्यापैकी दोन्ही संघाने 4 सामने जिंकले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना पुढील तीन सामने जिंकणे अनिवार्य आहे. मात्र आजच्या सामन्यात एक संघ बाद होणार आहे. कारण आज हरलेल्या संघाने पुढचे 2 सामने जिंकले तरी त्याला केवळ 12 गुणच मिळू शकतील. जरी सीएसके, एलएसजी आणि डीसीचे सध्या 12 गुण आहेत, परंतु लखनऊ आणि दिल्ली यांच्यात अद्याप सामना बाकी आहे, ज्यामुळे त्यापैकी एक निश्चितपणे 14 गुणांवर पोहोचेल.

    साखळी फेरीत मुंबईचे फक्त दोन सामने बाकी आहेत. अशा स्थितीत मुंबईने आपले दोन्ही सामने जिंकले तरी केवळ 12 गुणच मिळवता येतील. अशा स्थितीत इतर संघांच्या गुणांचे समीकरण असे बनते की मुंबई कोणत्याही परिस्थितीत अंतिम चारमध्ये पोहोचू शकणार नाही.