भारतीय क्रिकेटमध्ये देखील भाकरी फिरवणार, प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची जागी महेंद्रसिंह धोनी घेणार? क्रिकेटप्रेमीना उत्सुकता…

अन्य प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे सपोर्ट स्टाफमध्ये बदल होऊ शकतो. राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना प्रशिक्षकपदावरून हटविले पाहिजे अशी क्रिकेटप्रेमीची मागणी आहे. तर राहुल द्रविच्या जागी प्रशिक्षकपदी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) नियुक्ती करण्याच्या विचारात बीसीसीआय सचिव जय शाह आहेत.

    नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये (Cricket) सुद्धा भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे. कारण मागील काही महिन्यापासून भारतीय संघाला साजेशी कामगिरी करता आलेली  नाही, त्यामुळं दिग्गज माजी फलंदाज राहुल द्रविड सध्या टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या कार्यकाळात दोनवेळा भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेमध्ये अजिंक्यपद जिंकण्याची संधी हुकली. त्यामुळं त्यांच्या जागी अन्य प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे सपोर्ट स्टाफमध्ये बदल होऊ शकतो. राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना प्रशिक्षकपदावरून हटविले पाहिजे अशी क्रिकेटप्रेमीची मागणी आहे. तर राहुल द्रविच्या जागी प्रशिक्षकपदी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) नियुक्ती करण्याच्या विचारात बीसीसीआय सचिव जय शाह आहेत.

    रोहित शर्मा आणि राहुल द्रविडची सुट्टी मिळणार

    दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यांपासून भारतीय संघाला महत्त्वाच्या स्पर्धेत अपयश आले आहे. त्यामुळं प्रशिक्षकाबरोबर कर्णधार रोहित शर्माची देखील उचलबांगडी होऊ शकते. प्रशिक्षक द्रविडे हे शांत स्वभावाचे आहेत, त्यामुळं द्रविड यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. तसेच रोहित शर्मा याला देखील कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळं द्रविडसह रोहित शर्माला देखील नारळ मिळणार आहे.

    जय शाह लवकरच मोठा निर्णय घेणार

    या वर्षी भारतीय संघ मायदेशात वनडे विश्वचषक खेळणार आहे. आपल्या यजमानपदाखाली भारतीय संघाला विजेतेपद मिळविण्यात अपयश आले तर रोहित शर्मा आणि राहुल द्रविडची सुट्टी होऊ शकते. द्रविड यांच्या कार्यकाळात भारतीय संघाला आशिया कप २०२२, टी-२० विश्वचषक २०२२ आणि डब्ल्यूटीसी फायनल २०२३ यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अपयश आले. त्यामुळे जय शाह लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.