अवघ्या काही तासाभरातच IND Vs PAK मध्ये होणार महामुकाबला, चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

टी-२० वर्ल्डकपमध्ये अद्याप भारतानं पाकिस्तानकडून एकदाही पराभवाचा सामना केलेला नाही. या पार्श्वभूमीवर टीम इंडिया आजही जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियांनं सन २००७ च्या टी-२०वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला धूळ चारत ट्रॉफी पटकावली होती.

    दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) आज टी-२० वर्ल्डकपच्या (T20 World Cup 2021) सुपर-१२ मधील भारतविरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) असा महामुकाबला होणार आहे. काही क्षणांतच हे दोन्ही संघ तब्बल सातव्यांदा आमनेसामने येणार आहेत. या लढतीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

    टी-२० वर्ल्डकपमध्ये अद्याप भारतानं पाकिस्तानकडून एकदाही पराभवाचा सामना केलेला नाही. या पार्श्वभूमीवर टीम इंडिया आजही जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियांनं सन २००७ च्या टी-२०वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला धूळ चारत ट्रॉफी पटकावली होती.

    असे आहेत दोन्ही संघ…

    भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

    पाकिस्तानी संघ – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), फखर जमान, हैदर अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हारिस रऊफ, शाहीन आफ्रिदी.