Shubman Gill

India vs Australia World Cup Final 2023 | मिचेल स्टार्क याने शुबमन गिल याला आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिली विकेट मिळवून दिली. शुबमन गिल याला आपल्या दुसऱ्या होम ग्राउंडमध्ये दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

  अहमदाबाद : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. कॅप्टन पॅट कमिन्स याने टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि युवा शुबमन गिल बॅटिंगसाठी आले. रोहित शर्मा याने शांत सुरुवातीनंतर आपल्या बॅटिंगचा दांडपट्टा सुरु करत फटकेबाजी केली. तर दुसऱ्या बाजूने शुबमन गिल रोहितला चांगली साथ देत होता. टीम इंडियाच्या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात केली. मात्र कांगारु ही ओपनिंग जोडी फोडण्यात यशस्वी ठरले. कांगारुंनी आपल्या दुसऱ्या होम ग्राउंडमध्ये खेळत असलेल्या धोकादायक शुबमन गिल याला आऊट केला.
  शुभमनचं हे दुसरं होम ग्राउंड
  मिचेलने टीम इंडियाच्या डावातील पाचव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर एडम झॅम्पा याच्या हाती कॅच आऊट केलं. शुबमन 7 चेंडूत 4 धावा करुन माघारी परतला. शुबमनचं हे दुसरं होम ग्राउंड आहे. शुबमन आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. शुबमनने या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेत आणि टीम इंडियासाठी बॅटिंगने धमाकेदार कामगिरी केली आहे. त्यामुळे शुबमनकडून महाअंतिम सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र शुबमनने सपशेल निराशा केली.
  शुभमनची नरेंद्र मोदी स्टेडियममधील आकडेवारी
  शुबमनने या स्टेडियममध्ये आयपीएलमधील 12 सामन्यात 48.73 च्या सरासरीने 669 धावा केल्या आहेत. शुबमनने या दरम्यान 2 शतकं झळकावली आहेत. तसेच 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. तर शुबमनने 3 आंतरराष्ट्रीय सामने इथे खेळले आहेत. गिलने या 3 पैकी 2 कसोटी सामन्यांमध्ये 193 धावा केल्या आहेत. या दरम्यान गिलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1 शतक केलं. तर शुबमनने या स्टेडियममध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तान विरुद्ध 11 बॉलमध्ये 16 धावा केल्या.
  टीम इंडिया प्लेईग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
  ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.