पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडला टीम इंडियाकडून मोठा दणका, आता दुसऱ्या वनडेआधीच इंग्लंडच्या अडचणीत वाढ, काय आहे कारण?

मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलर याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. क्षेत्ररक्षण करताना मॉर्गनच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना दुखापत झाली, नंतर चार टाके मारुन तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला पण ३० चेंडूत केवळ २२ धावा बनवून तो बाद झाला. तर, क्षेत्ररक्षणादरम्यान सीमारेषेवर एक चौकार अडवताना बिलिंग्स जायबंदी झाला. त्याच्या गळ्याच्या हाडाला दुखापत झाली.

    टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड यांच्यात पहिली एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली आहे. पुण्यात काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांना ६६ धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला, यासोबतच तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड आता ०-१ ने पिछाडीवर आहेत. त्यामुळे २६ मार्च रोजी होणारा दुसरा एकदिवसीय सामना जिंकणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. परंतु दुसऱ्या वनडेआधीच इंग्लंडच्या अडचणीत वाढ झाली आहे.

    दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गन आणि यष्टीरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग्स यांच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. मॉर्गनच्या अनुपस्थितीत जोस बटलर याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. क्षेत्ररक्षण करताना मॉर्गनच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना दुखापत झाली, नंतर चार टाके मारुन तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला पण ३० चेंडूत केवळ २२ धावा बनवून तो बाद झाला. तर, क्षेत्ररक्षणादरम्यान सीमारेषेवर एक चौकार अडवताना बिलिंग्स जायबंदी झाला. त्याच्या गळ्याच्या हाडाला दुखापत झाली. जखम असतानाही बिलिंग्स देखील फलंदाजीसाठी मैदानात उतरला, पण त्यालाही केवळ १८ धावाच करता आल्या.

    दरम्यान सामना संपल्यानंतर याबाबत बोलताना, पुढील सामन्याआधी ४८ तास आम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. शुक्रवारच्या सामन्याआधी ही दुखापत बरी होण्यासाठी शक्य तेवढा वेळ देऊ, असं मॉर्गन म्हणाला.