तिसऱ्या टेस्टमध्ये द. अफ्रिकेचा डाव २१० वर आटोपला, टीम इंडियाला १३ रन्सचे लीड, बुमराहने घेतल्या पाच विकेट्स

उमेश यादव आणि मोहम्मद शमी याने २-२ विकेट्स घेतल्या. द. अफ्रिकेकडून कीगन पिटरसनने सर्वाधिक ७२ रन्स केले आहेत. दुसऱ्या डावात टीम इंडियाचा स्कोअर ३/० असा नोंदवला गेला आहे. एल राहुल आणि मयंक अग्रवाल हे सध्या पिचवर आहेत. बुमराहने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये सातव्या वेळी पाच विकेट्स घेतले. द. अफ्रिकेविरोधात त्याने दुसऱ्या वेळी हा विक्रम केला आहे.

    केपटाऊन : भारत आणि द. अफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या मंहत्त्वाच्या तिसऱ्या टेस्टमध्ये, द. अफ्रिकेचा पहिला डाव २१० रन्सवर आटोपला. त्यामुळे पहिल्या डावाच्या आधारावर, टीम इंडियाला १३ रन्सची आघाडी मिळाली आहे. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ विकेट्स काढल्या आहेत. उमेश यादव आणि मोहम्मद शमी याने २-२ विकेट्स घेतल्या. द. अफ्रिकेकडून कीगन पिटरसनने सर्वाधिक ७२ रन्स केले आहेत. दुसऱ्या डावात टीम इंडियाचा स्कोअर ३/० असा नोंदवला गेला आहे. एल राहुल आणि मयंक अग्रवाल हे सध्या पिचवर आहेत. बुमराहने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये सातव्या वेळी पाच विकेट्स घेतले. द. अफ्रिकेविरोधात त्याने दुसऱ्या वेळी हा विक्रम केला आहे.

    द. अफ्रिकेला ५ रन्सची पेनाल्टी मिळाली

    द. अफ्रिकेचा स्कोअर जेव्हा १३९ रन्स होता, तेव्हा शार्दुल ठाकूरच्या बॉलवर, चेतेश्वर पुजाराने बाऊमाचा कॅच सोडला. त्यानंतर बॉल विकेटकिपरच्या मागे ठेवलेल्या हेल्मेटला लागला. त्यामुळे द. अफ्रिकेला ५ र्नसची पेनाल्टी मिळाली.

    विराटच्या टेस्टमध्ये १०० कॅच पूर्ण

    विराट कोहलीने तेंबा बऊमाचा कॅच घेतल्यानंतर, त्याचे टेस्ट विकेटमधील १०० विकेट्स पूर्ण केले. विराट आपल्या करिअरमधील ९९ वी टेस्ट खेळतोय. या फॉरमॅटमध्ये कॅचची सेंच्युरी करणारा, टीम इंडियाचा सहावा खेळाडू ठरला आहे. २०९ कॅचसह या यादीत कोट राहुल द्रविड पहिल्या स्थानावर आहेत.