कोहलीने मोडले तेंडुलकरचे आणखी दोन रेकॉर्ड, बनला सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

भारतीय रन मशिन विराट कोहलीसाठी देखील हा टी-२० विश्वचषक तसा चांगलाच होता असे म्हणता येईल. परंतु किंग कोहलीने पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले हे नक्कीच दुःखदायक आहे.

    नवी दिल्ली – टी-२० विश्वचषकात केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर विराट कोहली आयसीसी टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या खेळीनंतर कोहलीच्या नावावर आयसीसी टूर्नामेंटमध्ये २७५७ धावा झाल्या आहेत.

    भारतीय रन मशिन विराट कोहलीसाठी देखील हा टी-२० विश्वचषक तसा चांगलाच होता असे म्हणता येईल. परंतु किंग कोहलीने पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले हे नक्कीच दुःखदायक आहे. इंग्लंडने टीम इंडियाचा १० विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभव करून सेमीफायनलमध्येच विश्वचषक मोहीम संपवली.

    मात्र या स्पर्धेतून बाहेर पडण्यापूर्वी विराट कोहलीने क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. यापैकी एक म्हणजे ICC विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विश्वविक्रम हा आहे.