राहुल आणि जडेजाची संयमी खेळी; भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु झाली. मुंबईच्या वानखेडे मैदानात झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना रंगला. भारताने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु झाली. मुंबईच्या वानखेडे मैदानात झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना रंगला. भारताने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आता टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियावर (AUS) पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं.

राहुलने ९१ चेंडूत नाबाद ७५ धावांची खेळी साकारली. तर रविंद्र जडेजाने ६९ चेंडूत ४५ धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी रचलेल्या शतकी भागिदारीमुळं भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. भारताचे टॉप ऑर्डरचे फलंदाज इशान किशन, शुबमन गिल,विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. पण पण कर्णधार हार्दिक पांड्या आणि के एल राहुलने टीम इंडियाची कमान सांभाळली. परंतु, स्टॉयनीसच्या गोलंदाजीवर पांड्या बाद झाला आणि भारताला पुन्हा मोठा धक्का बसला.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करत टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला.