भारताच्या 14 ओव्हरमध्ये 2 विकेटवर 65 धावा, पाहा लाईव्ह अपडेट

    IND Vs BAN Live Score : बांगलादेशचे सुरुवातीचे 3 फलंदाज 30 धावांत परतल्यानंतर कर्णधार शाकिबने संघाची कमान सांभाळत दमदार अर्धशतक ठोकत 85 चेंडूत 80 धावा केल्या. त्याला तोव्हीद ऱ्हीदोयने चांगली साथ दिली. त्यानंतर नसूम अहमदनेसुद्धा संघाच्या धावसंख्येत 44 धावांची भर टाकत धावफलक हलता ठेवला.

    भारतासमोर 266 धावांचे लक्ष्य

    बांगलादेशकडून कर्णधार शाकिब, तोव्हीद ऱ्हीदोय आणि नसूम अहमद यांनी धावसंख्येला चांगलाच आकार दिला. त्यानंतर आलेल्या महेंदी हसन आणि तन्झीम शाकीबने नाबाद राहून बांगलादेशची धावसंख्या 265 वर नेऊन पोहचवली. भारतासमोर 266 धावांचे लक्ष्य ठेवले.

    रोहित शर्मा आणि तिलक वर्मा सलामीला

    आज भारताकडून रोहित शर्मा आणि तिलक वर्मा ही जोडी सलामीला उतरली आहे. कर्णधार रोहित शर्माने तिलक वर्माचा संघात समावेश करून त्याला संधी दिली आहे. तिलक वर्माने आयपीएल टी20  मध्ये धमाकेदार कामगिरी करीत रोहितचे लक्ष वेधून घेतले होते.

    भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आज भारताची गोलदाजांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या फळीतील तीन फलंदाज बांगलादेशच्या 30 धावा असतानाच तंबूत परतल्या होत्या.

    बांगलादेशची सलामी जोडी फुटली

    सलामीवीर तान्झीद हसनला शार्दुल ठाकूरने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर लिटन दासला मोहम्मद शमीने त्रिफळाचित करून 0 वरच तंबूत पाठवले. अनमूल हक हा शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर केएल राहुलद्वारा झेलबाद झाला.

     

    आशिया चषक 2023 मधील सुपर 4 मधील शेवटचा साखळी सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने यावेळी आपल्या ताफ्यात तिलक वर्माला सामील करून घेतले आहे.

    बांगलादेश सुपर 4 लीगमधून बाहेर

    बांगलादेश या अगोदरच या सुपर 4 लीगमधून बाहेर पडली आहे. तरीही बांगलादेश केवळ शेवट गोड व्हावा या हेतूने सामना जिंकण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर भारताने श्रीलंकेला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तरीही भारत हा सामना जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.

    भारत-बांगलादेश सामन्यावेळी कोलंबोतील हवामान :

    भारत आणि बांगलादेशमध्ये आज दुपारी ३ वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. तर त्याआधी 30 मिनिटांआधी 2.30 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. हवामानाच्या अहवालानुसार भारत आणि बांगलादेशच्या सामन्यादरम्यान संध्याकाळी 5 ते 6 वाजता मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळेत सामना काहीवेळ थांबवला जावू शकतो मात्र त्यानंतर पावसाचा शक्यता कमी आहे.

    भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास

    भारत आणि पाकिस्तामधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर नेपाळवर भारताने विजय मिळवत सुपर 4 मधील स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर सुपर 4 मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. पावसामुळे हा सामना दोन दिवस चालला होता. मात्र भारतीय संघाने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला होता. त्यानंतर श्रीलंकेलाही पराभूत करत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

    टीम इंडिया : रोहित शर्मा (क), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसीध कृष्णा खेळत आहेत

    टीम इंडिया : लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, अनामूल हक, शाकिब अल हसन (क), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान