भारत-न्यूझीलंड तिसरा वनडे, इंदोरमध्ये रोहित-शुबमनचे वादळ; इथं वाचा प्रत्येक अपडेट….

भारतीय सलामीवीरांनी पहिल्या १० षटकांत ८२ धावा केल्या. रोहित शर्माने ८३ चेंडूत शतक साजरे केले. त्याच्या या शतकी खेळीला ९ चौकार आणि ६ षटकारांचा साज होता. हे त्याचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक ठरले असून १९ जानेवारी २०२० नंतर रोहितने शतक झळकावले आहे. हे ३०वे शतक ठरले ज्यापद्धतीने हे दोन्ही खेळतात आहे त्यानुसार कदाचित रोहित शर्मा आपले चौथे द्विशतक मारू शकत होता मात्र तो १०१ धावांवर तो बाद झाला. तर शुबमन गिलने ७२ चेंडूत शतक साजरे केले.

    इंदोर – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना होळकर स्टेडियम इंदोर येथे खेळवला जात आहे. मालिकेतील पहिले २ सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. मात्र भारतीय संघासाठी आजचा सामना केवळ औपचारिकताच असला तरी आयसीसी रॅकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने किवी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी उत्कृष्ट खेळ दाखवत आपआपली शतके साजरी केली.

    -शुबमन गिलने ७२ चेंडूचे शतक , रोहित शर्माचे ८३ चेंडूत शतक
    भारतीय सलामीवीरांनी पहिल्या १० षटकांत ८२ धावा केल्या. रोहित शर्माने ८३ चेंडूत शतक साजरे केले. त्याच्या या शतकी खेळीला ९ चौकार आणि ६ षटकारांचा साज होता. हे त्याचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक ठरले असून १९ जानेवारी २०२० नंतर रोहितने शतक झळकावले आहे. हे ३०वे शतक ठरले ज्यापद्धतीने हे दोन्ही खेळतात आहे त्यानुसार कदाचित रोहित शर्मा आपले चौथे द्विशतक मारू शकत होता मात्र तो १०१ धावांवर तो बाद झाला. तर शुबमन गिलने ७२ चेंडूत शतक साजरे केले. गिलच्या या खेळीत १३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. त्याने द्विशतकपासून जी सुरुवात केली होती ती अशीच पुढे ठेवली आहे. सलग ४ डावातील शुबमनचे तिसरे शतक ठरले असून ११२ धावा करून तो बाद झाला. रोहित आणि शुबमन मध्ये २१२ धावांची सलामी भागीदारी झाली.