
अंतिम सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
आशिया चषक २०२३ फायनल : आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंका आणि भारत यांच्यात सामना रंगणार आहे. सध्याच्या स्पर्धेत दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. याआधी सुपर फोर फेरीतही हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये भारताच्या संघाने ४१ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघाने अंतिम सामना जिंकल्यास भारताचा संघ आठव्यांदा आशिया चषकावर कब्जा करेल.
आशिया चषकाच्या एकदिवसीय फॉर्मेटमध्ये हे संघ २० वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी १० सामने भारताने जिंकले, तर श्रीलंकेने १० सामने जिंकले. भारताच्या संघाने यापूर्वी ७ वेळा आशिया कप जिंकला होता, त्यापैकी ५ वेळा भारताने फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला होता. अंतिम सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. तर श्रीलंकेचे फिरकीपटू भारताच्या संघाला फिरवू शकतात.
१७ सप्टेंबर रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर आशिया कप २०२३ च्या अंतिम सामन्यात पावसाच्या धोक्यात श्रीलंकेने भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या वर्षीच्या खंडीय स्पर्धेत हवामानाने आपली भूमिका बजावली असून बहुतेक सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय आला आहे. स्पर्धेतील दोन सर्वोत्कृष्ट संघांमधील शिखर लढतीसाठीही अशाच प्रकारची चिंता कायम राहणार आहे. पण हवामानामुळे अंतिम फेरीतही व्यत्यय आला आहेत त्यामुळे जर हा पाऊस असाच सुरु राहिला तर मग अंतिम सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.