
भारत हा सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपची अंतिम फेरी गाठणारा एकमेव संघ ठरला. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये 2021-23 च्या डब्ल्यूटीसीची फायनल होणार आहे. न्यूझीलंड संघाने आपल्या घरच्या मैदानावर श्रीलंकेवर 2 गड्यांनी मात केली. न्यूझीलंड संघाच्या याच विजयाने टीम इंडियाला थेट यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट मिळाले.
अहमदाबाद– ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia-India) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्रॉफीचा चौथ्या व शेवटच्या कसोटी सामना (Test match) अखेर अनिर्णीत राहिला. त्यामुळं भारताने पहिल्या दोन कसोटी सामन्यात कांगारुंवर दणदणीत विजय मिळवला. तर त्यानंतर कांगारूनी पुनरागमन करत तिसऱ्या कसोटीत नऊ गडी राखत भारतावर शानदार विजय मिळवला. आणि चौथ्या कसोटीचा निर्णय न लागल्यामुळं अखेर भारताने बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्राफी 2-1 ने जिंकली आहे. नाणेफेक जिंकत कांगारुनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पहिल्य़ा डावात कांगारुनी 480 धावा केल्या, त्याला प्रतिउत्तर देताना भारताने भक्कम फलंदाजी करत 571 धावा केल्या. वैशिष्टे म्हणजे किंग कोहली, विराट कोहलीचे आणि शुभमन गिलचे झुझांर शतक. यामुळं भारताने मोठ्या धावसंख्येची मजल मारली. तर कांगारुकडून उस्मान ख्वाजाने 180 धावा केल्या. ख्वाजा याने 422 चेंडूचा सामना करताना 21 चौकारांच्या मदतीने 180 धावा केल्या. तर ग्रीन याने 114 धावांची खेळी केली.
भारताचे डब्ल्यूटीमधील तिकिट न्यूझीलंडमुळं
भारत हा सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपची अंतिम फेरी गाठणारा एकमेव संघ ठरला. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये 2021-23 च्या डब्ल्यूटीसीची फायनल होणार आहे. न्यूझीलंड संघाने आपल्या घरच्या मैदानावर श्रीलंकेवर 2 गड्यांनी मात केली. न्यूझीलंड संघाच्या याच विजयाने टीम इंडियाला थेट यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट मिळाले. भारताने 2021 मध्येही डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली होती. यादरम्यान न्यूझीलंडविरुद्ध पराभवामुळे टीम इंडिया उपविजेता ठरली होती. आता कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्राफीवर भारताचे वर्चस्व…
दरम्यान, कांगारुनी दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करत पाचव्या दिवशी 2 गडी गमावत 175 धावा केल्या. अखेर दोन्ही कर्णधारांच्या निर्णयाने पंचानी हा सामना ड्रा करण्याचा निर्णय घेतला. यजमान भारताने सलग 16 व्या कसोटी मालिका विजयाची नोंद नावे केली. भारताने सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (बीजीटी) जिंकली आहे. भारताने मालिका 2-1 ने आपल्या नावे केली. यापूर्वी भारतीय संघ 2017, 2019 आणि 2021 मध्येही या ट्रॉफीचा मानकरी ठरला होता. दरम्यान, या मालिकेत अश्विनाला मालिकवीराचा बहुमान मिळाला.