भारत-ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी; किंग कोहली! विराट कोहलीचं झुंझार शतक, भारत सुस्थितीत

नाणेफेक जिंकत कांगारुनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत कांगारुनी साडे चारशेच्यावर धावा केल्या आहेत, त्याला प्रतिउत्तर देताना भारताने भक्कम फलंदाजी करत आतापर्यंत पाच गडी गमावत ४५६ धावा केल्या आहेत. आजच्या दिवसाचे वैशिष्टे म्हणजे किंग कोहली, विराट कोहलीने झुझांर शतक झळकावले आहे.

अहमदाबाद– ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia-India) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्रॉफीचा चौथ्या व शेवटच्या कसोटी सामना (Test match) सुरु आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी या स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. भारताने पहिल्या दोन कसोटी सामन्यात कांगारुंवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर कांगारूनी पुनरागमन करत तिसऱ्या कसोटीत नऊ गडी राखत भारतावर शानदार विजय मिळवला. त्यामुळं भारताने बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्राफीत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकत कांगारुनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत कांगारुनी साडे चारशेच्यावर धावा केल्या आहेत, त्याला प्रतिउत्तर देताना भारताने भक्कम फलंदाजी करत आतापर्यंत पाच गडी गमावत ४५६ धावा केल्या आहेत. आजच्या दिवसाचे वैशिष्टे म्हणजे किंग कोहली, विराट कोहलीने झुझांर शतक झळकावले आहे.

कोहलीचे शानदार शतक

कांगारूनी सर्व बाद ४८० धावांचा डोंगर उभारल्यानंतर याला प्रतिउत्तर देण्यास दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी बिनबाद ३६ धावा केल्या होता. काल शुक्रवारी शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. याला पुजारा तसेच कोहली उत्तम साथ दिली. काल भारताने तिसऱ्या दिवशी ती गडी गमावत २९२ धावा केल्या होत्या. यानंतर आज चौथ्या दिवशी भारताने जडेजा व भरत याची विकेट गमावल्या. पण २०१९ नंतर विराट कोहलीने आज शानदार शतक झळकावले. विराटने तब्बल 241 बॉलमध्ये हे झुंजार शतक ठोकलंय.या खेळीत त्याने फक्त 5 चौकार ठोकले. विराटने जवळपास कसोटी क्रिकेटमध्ये 3 वर्षांनी हे शतक ठोकलंय. विराटचं कसोटीमधील हे 28 वं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वं शतक ठरलंय.

डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारत पोहचणार?

दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यातील आपले स्थान पूर्णपणे निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला या कसोटीत विजय अनिवार्य आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारताला ही कसोटी जिंकणं आवश्यक आहे, तर अंतिम सामन्यासाठी भारताला संधी मिळू शकेल. त्यामुळं या सामन्याला एक वेगळे वलय निर्माण झाले आहे. हा सामना अनिर्णीत राहिल्यास श्रीलंका संघाला अंतिम सामन्यात पोहचण्याची शक्यता अधिक आहे.