
तीन वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताला मालिका विजयाची संधी आहे. तसेच कांगारूंना मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकावाच लागेल. आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहेत.
विशाखापट्टणम– आज रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रविवारी मालिकेतील दुसरा वनडे सामना (ODI Match) होणार आहे. विशाखापट्टणम येथे हे दोन्ही संघ दुपारी १.३० वाजेपासून समोरासमोर भिडतील. भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर विजयी सलामीच्या सामन्यात कांगारुंवर पाच गडी राखत दणदणीत विजय (Win) मिळवला. त्यामुळं भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असणार. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताला मालिका विजयाची संधी आहे. तसेच कांगारूंना मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकावाच लागेल. आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार सराव केला आहे.
कर्णधार रोहित शर्माही पुनरागमन
दरम्यान, आज विशाखापट्टणम येथील मैदानावर सामना जिंकल्यासह भारताला मालिकेत विजयी आघाडी घेता येईल. आता टीमचा नियमित कर्णधार रोहित शर्माही पुनरागमन करणार आहे, त्यामुळं भारतीय संघाची फलंदाजी आणखी भक्कम झाली आहे. सलामीच्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यानं भारतीय संघ फॉर्मात आहे. यजमान भारतीय संघ आता घरच्या मैदानावर पाहुण्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची सलग दुसरी मालिका आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताला घरच्या मैदानावर मालिका विजयाची संधी आहे.
सामन्यावर पावसाचे सावट
सध्याच्या घडीला देशभरात सर्वच ठिकाणी पाऊस पडत आहे. वरुण राजाने कृपा केली आणि त्यामुळे पहिला वनडे सामना हा मुंबईत होऊ शकला. कारण मुंबईतही पावसाचे वातावरण होते, पण या लढतीमध्ये पावसाचा व्यत्यय आला नाही. पण विशाखापट्टणममधील चित्र मात्र वेगळे आहे. कारण येथे पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. पाऊस हा भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अडथळा आणू शकतो. त्यामुळे सामन्याची काही षटकं कमी होऊ शकतात.
हेड टु हेड आकडेवारी
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 144 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने 144 पैकी 80 सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 54 वेळा ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. तर 10 सामन्यांचा काही निकाल लागला नाही.
सामना कुठे व कसा पाहल?
सामन्याचे ठिकण – विशाखापट्टणम
वेळ : दु. १.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदूी (संबंधित एचडी वाहिन्या)