भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

    दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातील टी-२० मालिकेला आज २० सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. आयसीसीच्या टी-२० विश्वचषकापूर्वी तीन सामन्यांची टी-२० मालिका ऑस्ट्रेलिया आणि भारत यांमध्ये खेळवली जाणार आहे. त्याकरता ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला असून आगामी टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-२० सामना मोहाली येथे खेळला जाणार असून दुसरा आणि तिसरा टी-२० सामना नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहे.

    भारत ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचं वेळापत्रक :

    सामना                                तारीख                    ठिकाण
    पहिला टी-२० सामना      २० सप्टेंबर २०२२       मोहाली
    दुसरा टी-२० सामना       २३ सप्टेंबर २०२२          नागपूर
    तिसरा टी-२० सामना      २५ सप्टेंबर २०२२          हैदराबाद

    भारतीय संघ :
    रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

    ऑस्ट्रेलिया संघ:
    आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.