
कट्टर प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळं वाया गेला. त्यामुळं दोन्ही संघाने एक एक गुण देण्यात आला. मात्र सामन्याचा निकाल लागला नाही. आणि क्रिकेटप्रेमीचा मूडऑफ झाला. यानंतर काल भारत नेपाळ यांच्यात देखील पावसाने एन्ट्री घेतल्यामुळं पावसामुळे जवळपास 60-80 मिनिटांचा खेळ वाया गेला. त्यानंतर 10 वाजता पंचांनी पाहणी केली. व डकवर्थ लुईसनुसार सामना खेळविला गेला.
पल्लेकेले : आशिया कप 2023 ( Asia Cup) मध्ये काल भारतासाठी करो वा मरो अशी स्थिती होती. काल पाचवा सामना टीम इंडिया आणि नेपाळ (India Vs Nepal) या संघांमध्ये पावसाच्या व्यत्ययानंतर पार पडला. या सामन्यामध्ये भारताने नेपाळवर दणदणीत दहा गडी राखत मोठया फरकाने हा सामना जिंकला. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 4 फेरीसाठी पात्र ठरणार होता. टीम इंडिया आणि नेपाळमध्ये हा पहिलाच सामना पार पडला. टीम इंडियाने नेपाळला पराभूत करत सुपर 4 चं तिकीट फिक्स केले आहे. नेपाळ संघाने 214 धावांचे लक्ष्य दिले असताना, भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे मैदानात उतरले आहेत. रोहित शर्मा 4 धावांवर तर शुभमन गिल 12 धावांवर खेळत आहे. मात्र पावसाने व्यत्ययानंतर डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयासाठी 23 षटकात 145 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान सहज पार केले. भारताने 20.1 षटकात 147 धावांपर्यंत मजल मारली.रोहित शर्माने नाबाद 74 तर शुभमन गिल याने नाबाद 67 धावांची खेळी केली. (India beat Nepal by 10 wickets; Where is India in the ranking? What are the equations of super four)
A clinical performance with the bat from #TeamIndia! 👌 👌
Captain Rohit Sharma & Shubman Gill scored cracking unbeaten fifties to seal India’s 1⃣0⃣-wicket win (via DLS) over Nepal 🙌 🙌
Scorecard ▶️ https://t.co/i1KYESEMV1 #AsiaCup2023 | #INDvNEP pic.twitter.com/iOEwQQ26DW
— BCCI (@BCCI) September 4, 2023
नेपाळची आश्वासक सुरुवात…
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर नेपाळने सुरुवात चांगली केली असली तरी नंतर त्यांची फलंदाजी घसरली. सलामी जोडीने संयमी खेळी करीत 65 धावांची भागीदारी केली. यामध्ये कुशल भुर्तेलच्या तडफदार 25 चेंडूत 38 धावा आहेत. त्यानंतर आसिफ शेखनने दमदार 58 धावा करीत नेपाळच्या धावसंख्येला चांगला आका दिला. त्यानंतर आलेल्या भीम शार्की आणि रोहित पौडेल, त्याचबरोबर कुशल मल्ला हे एकेरी धावसंख्या करीत तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या गुलशन झाने 23 धावांची भर टाकली. मध्ये काही वेळ पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. नेपाळने दहा गडी गमावत भारतासमोर 214 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र डकवर्थ लुईसनुसार भारताला विजयासाठी 23 षटकात 145 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान सहज पार केले.
भारताची सुपर 4 मध्ये धडक….
दरम्यान, टीम इंडियाने या विजयासह सुपर 4 मध्ये धडक दिली आहे. टीम इंडियाचा सुपर 4 मधील पुढील सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा थरारक सामना पाहायला मिळणार आहे. 23 षटकात 145 धावांचे आव्हान दिले होते. मात्र रोहित आणि शुबमन या सलामी जोडीनेच हे आव्हान 20.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या जोडीने नाबाद 147 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा याने 59 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 74 धावा केल्या. तर शुबमन गिल याने 62 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 67 रन्स केल्या.
पावसाचे सावट आशिय कपवर…
श्रीलंकेत सहा देशामध्ये आशिया कप होत आहे. मात्र या स्पर्धेवर पावसाचे सावट कायम आहे. शनिवारी बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित व कट्टर प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळं वाया गेला. त्यामुळं दोन्ही संघाने एक एक गुण देण्यात आला. मात्र सामन्याचा निकाल लागला नाही. आणि क्रिकेटप्रेमीचा मूडऑफ झाला. यानंतर काल भारत नेपाळ यांच्यात देखील पावसाने एन्ट्री घेतल्यामुळं पावसामुळे जवळपास 60-80 मिनिटांचा खेळ वाया गेला. त्यानंतर 10 वाजता पंचांनी पाहणी केली. व डकवर्थ लुईसनुसार सामना खेळविला गेला.