भारताचा न्यूझीलंडवर ६५ धावांनी विजय

न्यूझीलंड संघाने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीला मैदानात फलंदाजीसाठी करीता उतरलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर ६ गडी गमावून १९१ धावा केल्या.

    भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या टी २० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६५ धावांनी विजय मिळवला. भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे भारताने दुसऱ्या सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे.

    न्यूझीलंड संघाने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीला मैदानात फलंदाजीसाठी करीता उतरलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर ६ गडी गमावून १९१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे किवी संघाला विजयासाठी १९२ धावाचे लक्ष दिले.

    न्यूझीलंड संघाला रोखण्यासाठी गोलंदाजी करीत मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला. भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. म्हणजेच आता ही मालिका भारतीय संघ जिंकू शकते किंवा ती ड्रॉ होऊ शकते.