भारताचा न्यूझीलंडवर 8 गडी राखून विजय, मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी

रायपूरच्या शाहीर वीर नारायण सिंग स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 34.3 षटकांत सर्वबाद 108 धावांवर आटोपला. त्याच्याकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावा केल्या. मिचेल सँटनरने 27 आणि गेल्या सामन्यातील शतकवीर मायकेल ब्रेसवेलने 22 धावा केल्या.

    रायपूर- भारतीय संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसरा आणि त्या स्टेडियममधील पहिला सामना शनिवार (२१ जानेवारी) रायपूरमध्ये शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. त्यात भारतीय संघाने गोलंदाजांच्या जोरावर अक्षरशःकिवींची दाणादाण उडवली. तब्बल ८ गडी राखून रायपूरचा सामना जिंकत मालिका खिशात घातली. रायपूरमध्ये खेळला जाणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असून भारतीय खेळाडूंना देखील याठिकाणी खेळण्याचा अनुभव नव्हता तरी देखील सामन्यात पूर्णपणे पहिल्या चेंडूपासून टीम इंडियाचे वर्चस्व पाहायला मिळाले.

    शमीने सर्वाधिक 3 बळी घेतले
    रायपूरच्या शाहीर वीर नारायण सिंग स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 34.3 षटकांत सर्वबाद 108 धावांवर आटोपला. त्याच्याकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावा केल्या. मिचेल सँटनरने 27 आणि गेल्या सामन्यातील शतकवीर मायकेल ब्रेसवेलने 22 धावा केल्या. किवी संघाच्या 8 फलंदाजांना 10 धावांचा आकडाही गाठता आला नाही. भारताकडून शमीने सर्वाधिक 3 बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने 2-2 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

    प्रत्युत्तरात भारताने 20 षटकांत 2 गडी राखून विजयासाठी आवश्यक धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा (51 धावा) 48 वे वनडे शतक झळकावल्यानंतर बाद झाला. रोहितने शुभमन गिलसोबत 86 चेंडूत 72 धावांची सलामी दिली. शेवटच्या 5 डावांमध्ये दोघांनी चौथ्यांदा 50+ भागीदारी केली.