भारताचा न्यूझीलंडवर सात विकेट्सने विजय

    दिल्ली : भारताचा मुख्य संघ एकीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २० (IND VS AUS) मालिका खेळत असतानाच दुसरीकडे भारताचा ‘अ’ संघ न्यूझीलंडच्या ‘अ’ संघाशी एकदिवसीय सामने खेळत आहे. २२ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड (India Vs NewZealand)  यांच्यात पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

    सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. न्यूझीलंडने १६७ धाव करून १६८ चे आव्हान भारतासमोर ठेवले होते. हे लक्ष भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी करून केवळ ३ गडी गमावत ३१. ५ षटकात पूर्ण केले. फलंदाजीच्या वेळी न्यूझीलंडचे सुरुवातीपासूनच गडी बाद होत होते. केवळ अष्टपैलू रिपॉनने ६१ धावांची कामे केली. तर भारताकडून शार्दूल ठाकूरने उत्तम गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतलय, तर कुलदीप सेननं ३ आणि कुलदीप यादवनं एक विकेट घेऊन चांगली बाजू सांभाळली.

    १६८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) १७ धावा करुन बाद झाला. ऋतुराजने ४१ तर राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) ३१ धावांची चांगली खेळी केली. हे दोघेही बाद झाल्यावर कर्णधार संजू सॅमसन आणि रजत पाटीदारने डाव सावरत सामना भारताला जिंकवून दिला. भारताने 31.5 षटकात ३ गडी गमावत १७० धावा करत सामना सात विकेट्सनी जिंकला.