जय हो…! भारताचा विंडिजवर तिसऱ्याच दिवशी १४१ धावांनी मोठा विजय, आर अश्विन-यशस्वी जयस्वाल विजयाचे शिल्पकार

टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी पहिला डाव 421 धावांवर घोषित केला. त्यानंतक टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात 130 धावांवर गुंडाळलं. यशस्वी जयस्वाल याने 171 धावांची धमाकेदार खेळी केली.

    वेस्ट इंडिज – दोन कसोटी मालिकेच्या सामन्यात भारताने (Inida) वेस्ट इंडिजवर (WI vs IND 1st Test)  १४१ धावांनी पहिला कसोटी सामना जिंकत मालिके 1-०ने आघाडी घेतली आहे. अश्विनने पहिल्या कसोटी सामन्यात 12 विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजचा पहिल्या डावात 150 आणि दुसऱ्या डावात 130 धावांत रोखले. यशस्वी जयस्वालची (Yashshavi jaishwal) पदार्पणात शतकी खेळी आणि आर. अश्विनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. या विजयाचे शिल्पकार ठरले ते यशस्वी जयस्वाल आणि आर अश्विन.

    विडिंजला 130 धावांवर गुंडाळलं

    टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी पहिला डाव 421 धावांवर घोषित केला. त्यानंतक टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात 130 धावांवर गुंडाळलं. यशस्वी जयस्वाल याने 171 धावांची धमाकेदार खेळी केली. टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

    भारताचा 421 धावांचा डोंगर

    पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल (171) आणि रोहित शर्मा (103) यांनी शतकी खेळी केली. तर विराट कोहलीने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली.  भारताकडे 271 धावांची आघाडी होती. भारताचा कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या दिवशी 421 धावांवर डाव घोषित केला. वेस्ट इंडिजला 150 धावांवर रोखल्यानंतर भारताने पहिल्या डावात पाच विकेटच्या मोबदल्यात 421 धावा केल्या.