भारताचे मालिका विजयाचे स्वप्न भंगलं, पावसानं विंडिजला वाचवलं; दुसरा कसोटी सामना अनिर्णित

प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजच्या संघाने 32 षटकांत 2 बाद 76 धावांपर्यंत मजल मारली होत. चौथ्या दिवशीच भारत जिंकेल असं वाटत होते. कारण शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी 289 धावांची गरज होती. मात्र पावसामुळं सामना होऊ शकला नाही. पावसानं विडिंजला वाचवलं.

    पोर्ट ऑफ स्पेन : विजयाच्या किती दूर…किती लांब…, असं वर्णन भारत आणि वेस्ट विंडिज (India Vs West Indies) यांच्यातील दुसऱ्या कसोटी (Test) सामन्यासाठी करावे लागेल. पावसानं (Rain) विंडिजची लाज राखली तर भारताला मालिका जिंकण्याचं आणि विंडिजला व्हाईटवॉश देण्याचं स्वप्न भंगलं. इंडियाने विंडिजला विजयासाठी 365 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाचव्या दिवशी पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे टीम खेळ होऊच शकला नाही. त्यामुळं सामना अनिर्णित राहिला. पाचव्या दिवशी सकाळपासूनच पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे पावसाने हजेरी लावली. दोन सत्रांचा खेळ संपला तरी पावसान थांबायचं नाव घेतले नाही. त्यानंतर अखेर पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. मात्र भारताचे विजयाचे स्वप्न भंगले.

    शेवटच्या दिवशी भारताला हव्या होत्या ८ विकेट

    दरम्यान, अखेरच्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी  289 धावांची गरज होती. विंडिजने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 76 धावा केल्या. मात्र पावसानेच पाचव्या दिवशी बॅटिंग केली. पावसाने थांबायचे नावच घेतले नाही. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजच्या संघाने 32 षटकांत 2 बाद 76 धावांपर्यंत मजल मारली होत. चौथ्या दिवशीच भारत जिंकेल असं वाटत होते. कारण शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी 289 धावांची गरज होती. मात्र पावसामुळं सामना होऊ शकला नाही. पावसानं विडिंजला वाचवलं.

    पावसामुळं गुणतालिकेत भारताला फटका

    अखेरच्या दिवशी भारताला आठ विकेट तर विडिंजला  289 धावा हव्या होत्या. पण पावसाने सामन्यात ख्वाडा घातला. त्यामुळे अनिर्णित ठेवावा लागला. विजयी संघाला 12 पॉइंट्स मिळतात. सामना अनिर्णित राहिल्यास 6 आणि ड्रॉ राहिल्यास दोन्ही संघाना प्रत्येकी 4-4 पॉइंट्स मिळतात. भारताचे बारा गुणांचे नुकसान झाले आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 मध्ये 12 गुणांचं नुकसान झालं.