115 धावांसाठीही भारताला करावा लागला संघर्ष; भारताचा वेस्ट वेस्ट विडिंजवर 5 विकेटनी विजय, टिम इंडियाची 1-0 ने आघाडी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामन्यात (India Vs West Indies) भारताने विडिंजवर पाच विकेटनी मात केली आहे. त्यामुळं तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवातच निराशाजनक झाली. टिम इंडियाला विजयासाठी संघर्ष करावा लागला.

  किंग्सस्टन ओव्हल : भारताचा वेस्ट वेस्ट इंडिज दौऱ्यात (India Vs West Indies) कसोटी (Test) मालिका भारताने जिंकल्यानतर आता एकदिवसीय मालिकेला कालपासून सुरुवात झालेय. टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली. त्यानंतर काल झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामन्यात (India Vs West Indies) भारताने विडिंजवर पाच विकेटनी मात केली आहे. त्यामुळं तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवातच निराशाजनक झाली. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर केल मेअर्स अवघ्या 2 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर ब्रॅण्डन किंग लगोलग 17 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर अलिक अथेन्झने 22 धावा करून रवींद्र जडेजाच्या हाती झेल देऊन तंबू गाठला. वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 114 धावांवर आटोपला. यावेळी कुलदीपने पाच विकेट घेतल्या. याला रवीद्र जाडेजा व अन्य गोलंदाजांची चांगली साध मिळाली.

  विजयासाठी 115 धावांसाठीही घामटा…

  दरम्यान, भारताला विजयासाठी फक्त 115 धावा हव्या होत्या, पण त्या करण्यासाठी भारताचा अर्धा संघ गारद झाला. वेस्ट इंडिजने पहिल्याच वनडेत भारतीय संघाला चांगलाच घाम फोडला. पण तरीही भारताला पहिल्या वनडे सामन्यात 5 विकेट्स राखून विजय साकारता आला. या विजयासह भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-० अशी आघाडी घेतली आहे. इशान किशनने यावेळी सर्वांधिक 53 धावांची दमदार खेळी साकारली. 115 माफक आव्हानाचा पाठलाग करतानाही भारतीय संघाची दमछाक उडाली. 115 धावांसाठी भारतीय संघाला 23 षटके आणि पाच विकेट गमवाल्या लागल्या. 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.

  गोलंदाजांची कमाल

  विडिंजने 23 षटकात 114 धावांपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजकडून शाय होप याने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. त्याशिवाय एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. जडेजा-यादव या फिरकी जोडीने विंडिजच्या फलंदाजांना नाचवलं. या दोघांनी विंडिजच्या फलंदाजांना बॉलिंगमधून बांधून ठेवलं. या जोडीने विंडिजच्या शेवटच्या 7 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव याने 4 तर रविंद्र जडेजा याने 3 विकेट्स घेतल्या. विंडिजचा बाजार अवघ्या 23 ओव्हरमध्ये 114 वर गुंडाळल्याने टीम इंडियाला विजयासाठी 115 धावांचं आव्हान मिळालं.

  कागदी वाघ ढेपाळले

  भारताला विजयासाठी फक्त 115 धावा हव्या होत्या, पण याचा पाठलाग करताना, शुबमन गिल 7, हार्दिक पंड्या 5 आणि शार्दुल ठाकूर याने 1 अशी खेळी केली. सू्र्यकुमार यादव 19 धावा करुन माघारी परतला. कॅप्टन रोहितने स्वत: ओपनिंगला न येता बदलाचे प्रयोग करुन पाहिले, जे यशस्वी ठरले नाहीत. एका बाजूला झटपट विकेट्स जात होते. तर दुसरी बाजू ईशानने लावून धरली होती. इशान किशनने यावेळी सर्वांधिक 53 धावांची दमदार खेळी साकारली. टीम इंडियाने 22.5 ओव्हरमध्ये 118 धावा केल्या. मात्र त्यासाठी 5 विकेट्स गमवाव्या लागल्या. मात्र त्याआधी भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. टिम इंडियाला विजयासाठी संघर्ष करावा लागला.