भारताचा पाकिस्तानवर 228 धावांनी ऐतिहासिक विजय; विराट, राहुल, कुलदीप विजयाचे शिल्पकार, आज श्रीलंकेसोबत लढत

के एल राहुल व विराट कोहलीने विक्रमी भागिदारी करत वैयक्तिक शतक करत संघाला धावांचा डोंगल उभार करुन दिला. के एल राहुलने १११ धावा तर विराट कोहलीने १२२ धावांची खेळी साकारत 356 धावां लक्ष्य पाकिस्तनासमोर दिले. मात्र, पाकिस्तानचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पाकची सुरुवात निराशाजनकच झाली. आणि फक्त पाकिस्तानला १२८ धावा करता आल्या

  कोलंबो : आशिया कप (Asia Cup) 2023 सुपर 4 मधील या स्पर्धेतील सर्वात हायव्होल्टेज सामना रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात खेळविण्यात आला. पण सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने हा सामना रिझर्व डेला सोमवारी पुन्हा खेळविण्यात आला. ज्या ठिकाणी सामना थांबला तिथून सामना पुन्हा खेळवला गेला. रविवारी २ बाद १४७ धावा भारताने केला. तिथून सुरुवात करताना के एल राहुल व विराट कोहलीने विक्रमी भागिदारी करत वैयक्तिक शतकी खेळी करत, संघाला धावांचा डोंगर उभा करुन दिला. के एल राहुलने १११ धावा तर विराट कोहलीने १२२ धावांची खेळी साकारत ३५६ धावांचं लक्ष्य पाकिस्तनासमोर दिले. पाकची सुरुवात निराशाजनकच झाली. आणि फक्त पाकिस्तानला १२८ धावा करता आल्या, त्यामुळं भारताने ऐतिहासिक म्हणजे २२८ धावांनी विजय मिळवला आहे. (India’s historic win over Pakistan by 228 runs; Virat, the architect of Rahul Kuldeep’s victory, bats with Sri Lanka today)

  विराट कोहली आणि केएल राहुलची विक्रमी खेळी
  विराट आणि केएल राहुलची दमदार खेळीने भारताची धावसंख्या ३५६ झाली. विराट कोहली आणि केएल राहुलने दमदार शतक ठोकले. विराट कोहलीने 93 चेंडूत दमदार 116 धावा केल्या. तर केएल राहूलनेसुद्धा 106 चेंडूत धमाकेदार 111 धावा केल्या. या दोन खेळाडूंच्या धमाकेदार खेळीने भारताची धावसंख्या 356 पर्यंत पोहचली. त्याआधी रविवारी कर्णधार रोहित शर्मा व शूभमन गिल यांनी १२१ धावांची सलामी देत संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली.

  पाकिस्तानचा संघ फक्त 128 धावांवर गारद
  भारताने दिलेल्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त १२८ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताने पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला. कुलदीप यादव याने पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कुलदीप यादव याने फखर जमान, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ यांना बाद केले. तर इमाम उल हक याला बुमराहने बाद केले. हार्दिक पांड्याने बाबर आझमला तंबूत पाठवले. शार्दूल ठाकूर याने मोहम्मद रिझवानचा अडथळा दूर केला. त्यामुळं पाकिस्तानचा संघाला १२८ धावा करता आल्या.
  कुलदीपचे ५ विकेट, आज भारताची श्रीलंकेसोबत लढत
  दरम्यान, सलामवीर फखर झमान याने सर्वाधिक 27 धावा केल्या. आघा सलमान आणि इफ्तिखार अहमद या दोघांनी प्रत्येकी 23 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन बाबर आझम याने 10 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर इतर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाकडून चायनमन बॉलर कुलदीप यादव याने दुसऱ्यांदा 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. तर शार्दुल ठाकुर, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. दरम्यान, पावसामुळं दोन दिवस चाललेल्या या सामन्यात आज सलग दुसऱ्या दिवशी आज भारताला श्रीलंकेसोबत खेळावे लागणार आहे.