भारताचा संघ भिडणार आयर्लंड सोबत, जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली संघाची दमदार कामगिरी

भारत विरुद्ध आयर्लंड (India vs Ireland) यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेचं नेतृत्व भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) करत आहे.

    भारत विरुद्ध आयर्लंड : भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये आज तिसरा टी-२० सामना पार पडणार आहे. भारताच्या संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिकून आधीच ही मालिका २-० अशी खिशात घातली आहे. भारत विरुद्ध आयर्लंड (India vs Ireland) यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेचं नेतृत्व भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) करत आहे. भारताचा संघ आजचा तिसरा सामना जिंकल्यानंतर आयर्लंडला त्यांच्याच घरात मात करेल. भारतीय संघाची आयर्लंडविरुद्धची ही तिसरी टी-२० मालिका असणार आहे. भारताच्या संघाने तीनही मालिकांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे भारताच्या संघाने आयर्लंडमध्ये त्यांच्या घराच्या मैदानावर त्यांना मात दिली आहे.

    भारत विरुद्ध आयर्लंडमध्ये यांच्यामध्ये आतापर्यत एकूण ७ टी-२० सामने झाले आहेत. यामध्ये भारताच्या संघानेर सर्व सामने जिंकले आहेत. आयर्लंडने मालिकेमधील तिसरा सामना भारताविरुद्धचा हा पहिला आणि ऐतिहासिक विजय ठरेल. तीन सामन्यांच्या मालिकेमधील पहिले दोन सामने जिंकून आज भारताचा संघ तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात त्यांच्या राखीव खेळाडूंना संधी देऊन आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये ८ षटके टाकली आहे यामध्ये तो आरामदायक दिसत आहे.

    भारताच्या संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेतही सहभागी व्हायचे आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या दौऱ्यावर असलेल्या राखीव खेळाडूंकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारताने या मालिकेमध्ये २-० अशी आघाडी घेतल्यांनंतर संघ व्यवस्थापनाला आवेश खान, जितेश शर्मा आणि शाहबाज अहमद या खेळाडूंना आजमावण्याची संधी आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला वारंवार संधी मिळत आहेत, मात्र त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यात आवेश खान किंवा मुकेश कुमार यांच्यावर प्रयत्न केले जाऊ शकतात.

    दोन्ही संघाचे खेळाडू पुढीलप्रमाणे –

    भारतीय संघ : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग. , मुकेश कुमार, आवेश खान.

    आयर्लंड संघ: पॉल स्टर्लिंग (क), अँड्र्यू बालबर्नी, मार्क अॅडायर, रॉस अॅडायर, कर्टिस कॅम्पर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वुरकोम, बेन व्हाइट, क्रेग तरुण.