राष्टकुल स्पर्धेत भारताची “या” क्रमांकांवर उडी

  इंग्लंडच्या बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) आठव्या दिवशी भारतातील कुस्तीपटूंनी (wrestlers) प्रतिस्पर्ध्यांना नमवून एकाच खेळातील तब्बल ६ पदक खिशात घातली. यामध्ये तीन सुवर्णपदकांसह एक रौप्य पदक आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यामुळे आता भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील एकूण पदक संख्या ही २६ वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे भारताने पदक संख्येनुसार राष्ट्रकुल स्पर्धेत ५ व्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

  यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्सच्या (Waitlifters) अप्रतिम कामगिरीनंतर आता कुस्तीपटूंनीही विशेष कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेच्या क्रमवारीत १४० पदकांसह प्रथम स्थान ऑस्ट्रेलियाने कायम राखले असून दुसऱ्या क्रमांकावर १३१ पदकांसह इंग्लंड, कॅनडा ६७ पादकांसह तिसऱ्या क्रमांकावर तर न्यूझीलंड ४१ पदकांसह चौथ्या स्थानी आहे.

  आठव्या दिवशी भारताच्या कुस्तीपटूंनपैकी अंशू मलिकने ५७ किलो वजनी गटात रौप्य पदक, साक्षी मलिकने ६२ किलो वजनी गटात सुवर्ण, कुस्तीपटू बजरंग पुनिया याने ६५ किलो वजनी गटात सुवर्ण, दीपक पुनियाने ८३ किलो वजनी गटात सुवर्ण तर मोहित ग्रेवलने पुरुषांच्या १२५ किलो वजनी गटात आणि ६८ किलोग्राम वजनी गटात दिव्या काकरनने कांस्य पदक जिंकले आहे. सातव्या दिवशी भारताची ७ व्या क्रमांकावर घसरण झाली होती. मात्र आत भारताने पदक संख्येनुसार राष्ट्रकुल स्पर्धेत ५ व्या क्रमांकावर आहे.

  भारताची पदकसंख्या :

  ९ सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिगुंना, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरूष संघ, सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया

  ८ रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशिला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक

  ९ कांस्य : गुरूराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरभ घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्विन शंकर, दिव्या काकरान, मोहित ग्रेवाल