बॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्णपदकाची हुलकावणी

    बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) बॅडमिंटनच्या सांघिक खेळातील अंतिम सामन्यात सुवर्णपदकाने भारताला हुलकावणी दिली आहे. मंगळवारी बॅडमिंटनच्या (Badminton) मलेशिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताला ३-१ या गुण संख्येने पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

    सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधूने (P.V. Sindhu) दमदार कामगिरी करत विजय मिळवला. परंतु भारताच्या अन्य बॅडमिंटनपटूंना साजेसा खेळत करता आला नाही. सिंधूने मलेशियाच्या गोह जिन वेईवर सरळ दोन गेम्समध्ये विजय मिळवला होता. सिंधूने पहिल्या गेममध्ये २२-२० अशी बाजी मारली. पहिल्या गेममध्ये सिंधू आणि वेई यांच्यामध्ये चुरस पहायला मिळाली असून त्यातही सिंधूने आपल्या अनुभवाच्या जोरोवर अनुभव पणाला लावला आणि पहिलेपहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये देखील सिंधूने धडाकेबाज कामगिरी करून २१-१७ असा विजय साकारला. सिंधूच्या विजयामुळे भारताला मलेशियाबरोबर १-१ अशी बरोबरी करता आली होती.

    किदम्बी श्रीकांतकडून भारताला यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्याला मलेशियाच्या टिझयंगकडून १९-२१, २१-६ आणि १६-२१ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भारत १-२ अशा पिछाडीवर पडला. त्यानंतर भारत आणि मलेशिया यांच्यामध्ये महिला दुहेरीचा निर्णायक सामना सुरु झाला. हा सामना गमावल्यावर भारताला सुवर्णपदक हुलकावणी देऊ शकत होते. या सामन्यातही भारताची चांगली सुरुवात झाली नाही. गायत्री गोपिचंद आणि थ्रीसा जॉली यांना मलेशियाच्या मुरलीथरन थिनाह आणि कुंग ले पीअर्ली तान यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले.

    तत्पूर्वी, भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक रानकीरेड्डी यांचा सामना आजच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या टेंग फाँग आणि वुई इक सो यांच्याबरोबर झाला. या सामन्यातील पहिला गेम चांगलाच रंगतदार झाला. पण भारताला पहिल्या गेममध्ये तीन गुणांनी पराभव पत्करावा लागला. भारताने पहिला १८-२१ असा गमावला होता. दुसऱ्या गेममध्येही ही भारताची जोडी ७-११ अशी पिछाडीवर होती. दुसरा गेम या जोडीने १५-२१ असा गमावला आणि भारत ०-१ अशा पिछाडीवर पडला.

    बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताचा सामना मलेशियाबरोबर होता. आतापर्यंत या स्पर्धेत भारताची या गटात दमदार वाटचाल झाली होती. त्यामुळे या अंतिम फेरीत भारताचे चिराग शेट्टी आणि सात्विक रानकीरेड्डी यांच्याकडून चाहत्यांना अविस्मरणीय कामगिरीची अपेक्षा होती. या दोघांनी अंतिम फेरीची दमदार सुरुवात केली होती.