भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी पराभव

    आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी २० विश्वचषक स्पर्धेपूर्वी सराव सामना पार पडला. या सामन्यात भारताने दमदार खेळी करत ऑस्ट्रेलिया संघाचा सहा धावांनी पराभव केला. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात या सराव सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं केएल राहुल, सूर्यकुमारच्या अर्धशतकीय खेळीवर २० षटकात सात विकेट्स गमावून ऑस्ट्रेलिया समोर १८७ धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र लक्षाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकात १८० धावा करू शकला.

    भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने मिचेल मार्शच्या रुपात ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिला धक्का दिला. युजवेंद्र चहलनं स्मिथला क्लीन बोल्ड करून भारताला दुसरं यश मिळवून दिलं. त्यांनंतर ग्लेन मॅक्सवेलही 23 धावा करून माघारी परतला. मार्कस स्टॉयनिसही 29 धावा करून बाद झाला.

    ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार आरोन फिंचनं एकाकी झुंज दिली. त्यानं या सामन्यात 79 धावांची खेळी केली. आरोन फिंचच्या रुपात ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का लागला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला अखेरच्या षटकात ११ धावांची गरज असताना षटकातील पहिल्या दोन चेंडूत दो धावा दिल्यानंतर मोहम्मद शामीच्या अखेरच्या चार चेंडूत ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज पव्हेलियनमध्ये परतले. या सामन्यात विराट कोहलीने कमालीचे क्षेत्ररक्षण केले असून त्याचे सर्वस्थरातून कौतुक होत आहे.