टीम इंडियाला तिसरा झटका, विराट कोहली 8 तर ईशान किशन फक्त 5 धावांवर बाद, गिलचे अर्धशतक

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 113 वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 55 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला.

    हैदरावा – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने11 षटकांत बिनबाद 59 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत. सध्या भारताचा स्कोर 109/02 असा आहे.

    दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 113 वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 55 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला. आकडेवारीनुसार, भारतीय संघ विजयांमध्ये न्यूझीलंडपेक्षा पुढे आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 52.35 टक्के विजय मिळवले आहेत. आणि न्यूझीलंडने 47.64 टक्के सामने जिंकले आहेत.