
आगामी वर्ल्ड कप 2023 च्या दृष्टीने एकदिवसीय मालिकेला फार महत्व आहे. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडला क्लीन स्वीप केल्यास ती एक उल्लेखनीय कामगिरी ठरेल. या मालिका विजयाने फॉर्मात असलेल्या भारताला आता जगातील नंबर वन वनडे संघ होण्याची संधी आहे.
इंदूर : सध्या भारतीय क्रिकेट (Cricket) संघ भलताच फार्ममध्ये आहे. इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यात मंगळवारी तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळविला जाणार आहे. मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच मालिका देखील खिशात टाकली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला (Sri Lanka) क्लीन स्वीप केला होता. आता न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. तसेच आजच्या विजयाने भारत एकदिवसीय फॉम्याटमध्ये जागतिक अव्वल स्थानी पोहचणार आहे.
अव्वल स्थानी…?
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूरच्या होळकर स्टेडियमवर तिसरा वनडे सामना होणार आहे. यातील विजयाने भारतीय संघाला आयसीसीच्या वनडे क्रमवारीत मोठी झेप घेता येईल. ११३ गुणांसह तिसऱ्या स्थानी असलेला भारतीय संघ विजयाने अव्वलस्थानी विराजमान होण्याची संधी आहे. तर दुसरीकडे आजचा सामना किवी हरल्यास न्यूझीलंड टीमची चौथ्या स्थानी घसरण होणार आहे.
एकदिवसीय मालिकेला फार महत्व
आगामी वर्ल्ड कप 2023 च्या दृष्टीने एकदिवसीय मालिकेला फार महत्व आहे. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडला क्लीन स्वीप केल्यास ती एक उल्लेखनीय कामगिरी ठरेल. या मालिका विजयाने फॉर्मात असलेल्या भारताला आता जगातील नंबर वन वनडे संघ होण्याची संधी आहे. यापासून टीम इंडिया अवघ्या एक पाऊल लांब आहे. यासाठी भारताला मंगळवारी इंदूरच्या मैदानावर विजय साजरा करावा लागणार आहे.
या खेळाडूंना संधी मिळणार?
यजमान भारतीय संघाकडून इंदूरच्या मैदानावरील तिसऱ्या वनडेसाठी युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि शाहबाजला संधी मिळण्याचे चित्र आहे. यातून वेगवान गोलंदाज सिराज व शमीला विश्रांती दिली जाईल. सलगच्या दोन विजयांनी टीम इंडियाने ही ३ वनडे सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. त्यामुळं वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि शाहबाजला संधी मिळण्याची शक्यता आहे.