भारताच्या प्रज्ञानंदची कमाल, FIDE वर्ल्ड कप चेस स्पर्धेत उपांत्य फेरीत फॅबियानो कारुआनाचा पराभव, विश्वनाथन आनंदनंतर अंतिम फेरीत जाणारा दुसरा भारतीय

विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. आनंदने सन २००० आणि २००२मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.

    बाकू (अझरबैजान) : भारताच्या क्रीडा क्षेत्रातून एक अभिमानास्पद बातमी समोर येत आहे. विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या प्रज्ञानंदने कमाल केली आहे. विश्वविजेता विश्वनाथ आनंदनतर अशी कामगिरी करणारा प्रज्ञानंद पहिला भारतीय ठरला आहे. भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपली स्वप्नवत घोडदौड कायम राखताना अमेरिकेच्या फॅबियानो कारूआनाला पराभवाचा धक्का देत सोमवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. दरम्यान, विशेष म्हणजे विश्वविजेता विश्वनाथ आनंदनतर अशी कामगिरी करणारा प्रज्ञानंद पहिला भारतीय ठरला आहे. (india pragyanand tops fabiano caruana in semi final at fide world cup chess championship becomes second indian to reach final after viswanathan anand)

    अंतिम सामन्यात कार्लसनशी लढत

    दरम्यान, आता अंतिम सामन्यात प्रज्ञानंदशी लढत मॅग्नस कार्लसनशी पडणार आहे. आता जेतेपदासाठी त्याला अव्वल जागतिक बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला नमवण्याची किमया साधावी लागेल. उपांत्य सामन्यात कारूआना यांच्यातील पारंपरिक पद्धतीचे दोन आणि ‘टायब्रेकर’मधील दोन डाव बरोबरीत सुटले. मात्र, १० मिनिटांच्या पहिल्या जलद डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रज्ञानंदने विजय नोंदवला. दुसऱ्या डावात कारूआनाला पांढऱ्या मोहऱ्यांनी विजय मिळवता आला नाही.

    विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय

    विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. आनंदने सन २००० आणि २००२मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. मात्र, त्यावेळी ही स्पर्धा साखळी आणि बाद पद्धतीने खेळवली जात होती. दोन डाव बरोबरीत सुटल्यानंतर ‘टायब्रेकर’मध्ये गेलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत १८ वर्षीय प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या कारूआनाला ३.५-२.५ अशा फरकाने पराभूत केले.