भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

    मुंबई : रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यात एक दिवसीय मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या महिला क्रिकेट (Indian Women Cricket Team) संघाने इंग्लंडच्या महिला संघाचा सात विकेट्सने मत देत पराभव केला. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघानं विजय मिळवला. इंग्लंडने भारतासमोर ५० षटकात २२८ दिलेले आव्हान भारतीय संघाने ४४. २ षटकात पूर्ण केलं.

    कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २२७ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून डॅनिअल वॅट (४३), अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स (नाबाद ५०) आणि सोफी एक्लेस्टोन (३१) यांच्या खेळीमुळे इंग्लंडचा संघानं सन्माजनक धावसंख्या उभारली. भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. त्याशिवाय झुलन गोस्वामीनं अचूक टप्प्यावर मारा केला. झुलन गोस्वामीनं १० षटकात फक्त २० धावा दिल्या. झुलन गोस्वामीनं दहा षटकात तब्बल ४२ चेंडू निर्धाव फेकले.

    इंग्लंड महिला संघानं दिलेल्या २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा अवघी १ धाव काढून तंबूत परतली होती. पण त्यानंतर स्मृती मंधानानं (Smruti Mandhana) सर्व सुत्रे हातात घेतली. स्मृती मंधानानं झंझावाती ९१ धावांची खेळी केली. यासिका भाटिया (५०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (७४) यांनी स्मृती मंधानाला चांगली साथ दिली. विजय दृष्टीक्षेपात आल्यानंतर स्मृती मंधाना बाद झाली. इंग्लंडकडून केट क्रॉस सर्वात यशस्वी ठरली. केट क्रॉसनं दोन भारतीय फलंदाजांना बाद केलं.