भारतीय मुलींनी इतिहास घडवला! दुसऱ्या टि-20 सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर सहा विकेटसनी दणदणीत विजय; ‘या’ खेळाडूंची कामगिरी ठरली लक्षवेधी

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना वेस्ट इंडीजला ६ बाद ११८ धावांवर रोखले. अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने तीन विकेट्स मिळवत भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली. याचबरोबर तिने भारतासाठी पुरुष व महिला क्रिकेटमध्ये मिळून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० बळी मिळवण्याचा कारनामा केला.

    केपटाऊन : महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत (Women T-20 World Cup) भारतीय पोरींनी पहिल्या सामन्यात इतिहास घडवला. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (Pakistan) सलामीच्या सामन्यात धूळ चारल्यानंतर आता भारतीय महिलांनी विश्वचषकातील दुसऱ्या टी-२० दुसऱ्या सामन्यात वेस्ट विंडीजला (India-West Windies) सहा विकेटनी हरवत शानदार विजय मिळवला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीज संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट विंडीजने ११८ धावांचे लक्ष्य दिले होते.

    दीप्ती शर्माचा विक्रम…

    या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना वेस्ट इंडीजला ६ बाद ११८ धावांवर रोखले. अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने तीन विकेट्स मिळवत भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली. याचबरोबर तिने भारतासाठी पुरुष व महिला क्रिकेटमध्ये मिळून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० बळी मिळवण्याचा कारनामा केला. तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या सामन्यातून भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने पुनरागमन केले. तर, पुणेकर अष्टपैलू देविका वैद्य हिलादेखील संघात संधी मिळाली होती.

    कौर आणि घोष यांची विजयी भागिदारी

    महिला विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. भारताची युवा खेळाडू रिचा घोषने केलेल्या 32 चेंडूत नाबाद 44 धावांच्या जोरावर दुसरा विजय मिळवत आपली घौडदौड कायम ठेवली आहे. चौथ्या विकेटसाठी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत विजयाचा पाया रचला. वेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हनाचा पाठलाग करताना  मागील सामन्यामधील मॅचविनर जेमीमाह रॉड्रिग्सलाही मोठी खेळी करता आली नाही.  त्यानंतर आलेल्या हरमनप्रीत कौर आणि रिचा घोषने खेळपट्टीवर तग धरत लक्ष्याच्या दिशेने वाटचाल केली.

    भारतीय संघाची खराब सुरूवात

    भारतीय संघाची खराब सुरूवात झाली. पुनरागन करणाऱ्या स्मृती मंधानाला चमक दाखवता आली नाही. अवघ्या 10 धावा करूनच तंबूत परतली. तर जेमीमाह रॉड्रिग्सलाही मोठी खेळी करता आली नाही. पन्नास धावांचा आत तीन विकेट गेल्या मात्र नंतर कौर व घोष यांनी चांगला जम बसवत संघाला विजयी केले. दुसरीकडे वेस्ट इंडिजला दुसऱ्या षटकातच पुजा वस्त्राकरने कर्णधार हेले मैथ्यूजला बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या शेमेन कैंपबेलने आणि स्टैफनी टेलरने भागादारी केली होती. 14 व्या ओव्हरमध्ये दीप्ती शर्माने जोडी फोडत संघाला यश मिळवून दिलं. दीप्तीने टी२० मध्ये १०० विकेट घेत नवा विक्रम केला आहे.