टी २० क्रमवारीत भारताच्या स्मृती मानधनाची दुसऱ्या स्थानी झेप

    भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smruti Mandhana) हिने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करून, टी २०च्या जागतिक क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. स्मृती मानधने टी २० क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून तर वन डेतही तिने सातव्या स्थानावर उडी मारली आहे. स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने मिताली राज हिचा मोठा विक्रम मोडीत काढला असून अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटर ठरली आहे. ठरली आहे.

    डावखुऱ्या स्मृती मानधना हिने अलिकडेच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या (England) टी २० मालिकेत १११ धावा फटकावल्या होत्या. तर पहिल्याच एकदिवसीय सामन्यात तिने ९१ धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे तिने टी २० त दोन तर वन डेत तीन स्थानांनी पुढे झेप घेतली आहे. भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट टीम यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी सेंट लॉरेन्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारतीय महिला संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

    भारतीय संघाने १९. १ षटकात ९९ धावांपर्यंत आपले तीन विकेट गमावल्या आहेत. गेल्या सामन्यात ९१ धावांची शानदार खेळी करणारी स्मृती मानधना यावेळी ४० धावा करुन बाद झाली. तिने ५१ चेंडूत चार चौकार आणि एक षटकार ठोकला. यासह मंधानाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे.

    एकदिवसीय क्रिकेटमध्ये मानधना हिने सर्वात जलद ३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिने ७६ एकदिवसीय डावात ३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह स्मृती मानधना हिने माजी कर्णधार मिताली राज हिचा विक्रम मोडला आहे. मितालीने ८८ डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पा गाठला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३ धावा पूर्ण करणारी भारताची सलामीवीर मानधना जगातील तिसरी खेळाडू ठरली आहे.