ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

    मुंबई : टी२० विश्वचषकानंतर आता भारताची ऑस्ट्रेलिया (Australia)आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) होणाऱ्या मालिकेसाठी देखील भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. यावेळी आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी२० सामने खेळण्यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. भारतात या दोन्ही मालिका खेळवण्याजाणार असून या मालिकांसाठी कर्णधार पदाची धुरा रोहित शर्मा (Rohit Sharma)तर उप कर्णधार पद के एल राहुल (KL Rahul) यांना देण्यात आले आहे.

    भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका २० ते २५ सप्टेंबर दरम्यान रंगणार असून या सामन्यांसाठी भारताने १६ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर या खेळाडूंच्या नावाची घोषणा झाली असून अंतिम 11 मध्ये कोणा-कोणाला संधी मिळेल हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

    भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचं वेळापत्रक :

    सामना                          तारीख                        ठिकाण                              वेळ
    पहिला टी-२० सामना – २०/०९/२०२२ – ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम – संध्याकाळी ७:३०
    दुसरा टी-२० सामना –   २३/०९/२०२२ – विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम  – संध्याकाळी ७:३०
    तिसरा टी-२० सामना – २५/०९/२०२२ – राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान       –  संध्याकाळी ७:३०

    दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका :

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना २८ सप्टेंबरला तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना २ ऑक्टोबर आणि तिसरा सामना ४ ऑक्टोबरला खेळला जाईल. यानंतर ६ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल, जी ११ ऑक्टोबरपर्यंत खेळली जाईल. एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

    रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी या खेळाडूंचा समावेश भारतीय संघात असणार आहे.