भारत-श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात, आज सलामीची लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज… सामना कधी, कुठे व किती वाजता पाहू शकता?

    मुंबई– नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच टीम इंडिया आपल्या घरच्या मैदानावर टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेबरोबर भिडणार आहे. यासाठी दोन्ही संघ विजयासाठी सज्ज झाले आहेत. श्रीलंका संघाने फेब्रुवारी २०१६ मध्ये यजमान भारताचा टी-२० सामन्यात पराभव केला होता. त्यानंतर टीमला अद्यापही भारताविरुद्ध टी-२० सामना जिंकता आलेला नाही. यजमान भारताने २०१६ पासून आजपर्यंत झालेल्या दहा टी-२० सामन्यांमध्ये सलग विजय संपादन केले आहेत. भारताने गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा ३-० ने धुव्वा उडवला होता. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ५ टी-२० मालिका झाल्या आहेत. यातील चार मालिका भारतीय संघाने आपल्या नावे केल्या आहेत. त्यामुळं हा वचपा भरुन काढण्यासाठी श्रीलंका संघ मैदानात उतरणार आहे.

    तर दुसरीकडे यजमान भारताला ही मालिका जिंकण्यासाठी सुवर्णसंधी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला उद्या मंगळवारपासून सुरुवात होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हे दोन्ही संघ सलामीच्या सामन्यात भिडणार आहेत, यादरम्यान श्रीलंका संघ गत सात वर्षांपासून भारतामध्ये टी-२० सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, यजमान भारताने आपला दबदबा कायम ठेवताना या फॉरमॅटमध्ये श्रीलंका टीमला धूळ चारली. पराभव केला आहे,

    भारतीय संघाकडून नव्या चेहऱ्यांना संधी यजमान भारतीय संघ आता टी-२० मालिकेदरम्यान नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहे. यातून युवा खेळाडूंना या मालिकेतून आपली क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. भारताकडून राहुल त्रिपाठी, शिवम मवी, मुकेशकुमार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघ ही टि-20 मालिका हार्दीक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. संध्याकाळी ७.०० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. नवीन वर्षातील पहिलाच सामना असल्यामुळं विजयाने श्रीगणेशा भारतीय संघ नूतन वर्षाची सुरुवात करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

    संभाव्य भारतीय संघ: 

    हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.