भारत विरुद्ध अफगाणिस्तान, कुणाचे पारडे जड, भारत वर्ल्ड कपमध्ये विजयी वाटचाल सुरु ठेवणार का?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये मागील पार पडलेल्या सामन्यांमध्ये भारताचे पारडे जड दिसत आहे.

    वनडे वर्ल्ड कप 2023 : भारताचा वनडे वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता. भारताच्या संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सलामी सामना सहाविकेट्सने जिंकला. वर्ल्ड कप २०२३ मध्ये विजयी सलामीनंतर भारताचा मुकाबला आता अफगाणिस्तान (Afghanistan) संघाशी होणार आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना ११ ऑक्टोबरला रंगणार आहे. आगामी सामन्यासाठी भारतीय खेळाडू दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर हा सामना दुपारी २ वाजता रंगणार आहे.भारताच्या संघाने सलामी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारत विजयी वाटचाल कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

    भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये मागील पार पडलेल्या सामन्यांमध्ये भारताचे पारडे जड दिसत आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने दोन सामने जिंकले आहेत. तर एक सामना बरोबरीत सुटला होता. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ मैदानावर आमनेसामने येणार आहेत. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये पहिला सामना मार्च २०१४ मध्ये झाला होता. मिरपूरमध्ये झालेल्या या सामन्यामध्ये भारताच्या संघाने ८ विकेट्सने विजय मिळवला होता.

    दुसरा सामना सप्टेंबर २०१८ मध्ये झाला होता. हा सामना बरोबरीत सुटला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे जून २०१९ मध्ये खेळला गेला. भारताच्या संघाने या सामन्यात अफगाणिस्तानचा ११ धावांनी पराभव केला होता.